
भरपूर चालून पोट- मांड्यावरील इंचभर सुद्धा चरबी कमी होत नाही? मग वॉकनंतर फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
वजन कमी करण्यासाठी सोप्या टिप्स?
वॉक करून सुद्धा वजन का कमी होत नाही?
वॉक केल्यानंतर फॉलो करा योग्य सवयी?
लठ्ठपणा आणि शरीराचे वाढलेले अनावश्यक वजन कमी करण्यासाठी अनेक लोक सकाळी उठून चालण्यासाठी बाहेर जातात. नियमित ३० ते ४० मिनिटं चालणे, सायकलिंग, व्यायाम इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण तरीसुद्धा वाढलेले वजन अजिबात कमी होत नाही. वजन वाढण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. कामाच्या गड्बडीमध्ये कायमच तिखट आणि बाहेरील जंक फूडचे सेवन केले जाते. पण आवडीने खाल्लेले चविष्ट पदार्थ शरीरासाठी धोकादायक ठरतात. सकाळी उठल्यानंतर मोकळ्या हवेत चालल्यामुळे फुफ्फुसांना मोकळी हवा मिळते. यासोबतच ऊर्जा आणि मानसिक शांतता सुद्धा मिळते. मोकळ्या हवेत चालल्यामुळे रक्तभिसरण सुधारते, हृदयाचे आरोग्य सुधारते. पण चालून आल्यानंतर केलेल्या चुकांमुळे वजन अजिबात कमी होत नाही.(फोटो सौजन्य – istock)
वजन कमी करण्यासाठी महिलांसह पुरुष सुद्धा कायमच बाजारात उपलब्ध असलेले महागडे डाएट, सप्लिमेंट्स, तासनतास व्यायाम केला जातो. पण चुकीचा डाएट आणि व्यायाम केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वॉक करून आल्यानंतर कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यास महिनाभरात तुमचे वाढलेले वजन झपाट्याने कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल. सकाळी उठल्यानंतर व्यायाम केल्यामुळे शरीराला असंख्य फायदे होतात.
सकाळी उठल्यानंतर अनेकांना चालायला जाण्याची सवय असते. त्यामुळे जाताना सोबत पाण्याची बाटली घेऊन जावे. शरीरातील पाणी घामेवाटे बाहेर पडून जाते. यामुळे शरीर डिहायड्रेट होण्याची जास्त शक्यता असते. पाणी शरीरातील सर्व गीष्टींची कमतरता भरून काढते. शरीरातील इलेक्ट्रोलाईटचे संतुलन राखण्यासाठी लिंबू पाणी किंवा इलेक्ट्रोलाईट ड्रिंकचे सेवन करावे. यामुळे शरीर हायड्रेट राहते. पाण्याच्या सेवनामुळे चयापचय क्रिया सुधारते, शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात.
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक महागडा डाएट फॉलो करतात. पण चुकीचा आणि शरीरास सहन न होणारा डाएट फॉलो केल्यामुळे आरोग्य आणखीनच बिघडते. त्यामुळे चालू आल्यानंतर काहीवेळ शांत बसावे. त्यानंतर नाश्ता करावा. सकाळच्या नाश्त्यात अंड्यांसोबतच मिल्क शेक, स्मूदी, ताज्या फळांचे सेवन करावे. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर चालून आल्यानंतर नाश्त्यात प्रोटीन युक्त पदार्थांचे सेवन करावे. यामुळे तुमचे पोट जास्त वेळ भरलेले राहील आणि शरीराला सुद्धा अनेक फायदे होतील.
चालून आल्यानंतर किंवा व्यायाम करून आल्यानंतर शरीर खूप जास्त थकलेले असते. याशिवाय चालल्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. तसेच शरीराचे तापमान सुद्धा वाढते. त्यामुळे १५ ते २० मिनिटं एकजागेवर शांत बसून राहावे. शरीराचे तापमान संतुलित झाल्यानंतर पुढील गोष्टी कराव्यात, अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय रोजच्या आहारात हंगामी फळांचे सेवन करावे. सफरचंद, संत्री किंवा पपई इत्यादी विटामिन युक्त फळे खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
Ans: संतुलित आहार घ्या, ज्यात भरपूर फळे, भाज्या, पातळ प्रथिने आणि संपूर्ण धान्य असावेत.
Ans: वजन कमी करण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. रोज किमान १५-२० मिनिटे चाला, धावणे किंवा कार्डिओ व्यायाम करा.
Ans: नाही, वजन कमी करणे म्हणजे जीवनशैलीतील बदल आहे. त्यात संतुलित आहार आणि नियमित व्यायामाचा समावेश असतो, केवळ डाएटिंग नाही.