थोडस खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात गुडगुड होते? स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचे सेवन करून गॅस-ब्लोटिंगवर मिळवा कायमचा आराम
पोटाच्या समस्या वाढण्याची कारणे?
ऍसिडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय?
अपचनाच्या समस्येंपासून आराम मिळवण्यासाठी काय खावे?
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत जंक फूडचे सेवन, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, अपुरी झोप इत्यादी अनेक कारणांमुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. वारंवार तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडते. याशिवाय अनेकदा थोडस खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात लगेच गुडगुड होण्यास सुरुवात होते. पोटात वाढलेल्या जडपणामुळे शरीराला खूप जास्त हानी पोहचते. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे ऍसिडिटी, गॅस, अपचनाच्या समस्या वाढून पचनक्रियेवर जास्तीचा तणाव येतो. शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर ती पुन्हा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर डोकेदुखी, उलट्या आणि मळमळ होते.(फोटो सौजन्य – istock)
पोट फुगणे म्हणजे गॅस नसून पचनसंस्थेत अडकलेली हवा किंवा पचन प्रक्रियेतील बिघाड असण्याची शक्यता असते. आतड्यांमध्ये जमा झालेल्या गॅसमुळे पोटाचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी अनेक लोक गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण असे न करता स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. स्वयंपाक घरातील पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अजिबात हानी पोहचत नाही. पोटाच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करावे.
पोटाचेआरोग्य चांगले ठेवण्यासाठी पोषक आहार घेणे आवश्यक आहे. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यांचा वापर जेवणातील वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सुद्धा केला जातो. वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर आतून स्वच्छ होते. मसाल्यांमध्ये पॉलिफेनॉल घटक खूप जास्त प्रमाणात आढळतात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट घटक आतड्यांमधील घाण स्वच्छ करतात आणि चांगल्या बॅक्टरीया वाढवण्यास मदत करतात.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आतड्यांमधील घाण स्वच्छ करतात. यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याचा रस पिऊन त्यावर कोमट पाणी प्यावे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला अनेक गुणकारी फायदे होतात. आल्यामध्ये पॉलीफेनॉल, जिंजरॉल नावाचा घटक आढळून येतो. त्यामुळे जेवणानंतर आल्याचा बारीक तुकडा चघळून खावा. यामुळे पोटात वाढलेली गुडगुड कमी होऊन आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होईल.
पोटात वाढलेला गॅस आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याचे सेवन केले जाते. पोटात गुडगुड किंवा वेदना होत असल्यास चिमूटभर ओवा खाऊन त्यावर कोमट पाणी प्यावे. यामुळे पोटात वाढलेल्या वेदना कमी होतात आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाते. ओव्यामध्ये थायमोल आढळून येते, ज्यामुळे पोटातील एन्झाइम्सना सक्रिय होतात आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. ओवा कोमट पाण्यात मिक्स करून प्यायल्यास पोटाच्या समस्या कायमच्या नष्ट होतील.
औषधांशिवाय शांत झोप! हे 4 नैसर्गिक पदार्थ ठरू शकतात स्लीपिंग पिल
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नियमित ताक प्यावे. कोणत्याही ऋतूंमध्ये ताकाचे सेवन केल्यास शरीराला फायदे होतात. ताक प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. याशिवाय संपूर्ण दिवस ताक पिऊन राहिल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल आणि पचन सुलभ करण्यास मदत होईल. ताक, दह्यात असलेले लॅक्टिक ऍसिड पोटाच्या संतुलन कायमच टिकवून ठेवतात आणि आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीया निर्माण करतात.
Ans: पोटात वायू, हवा किंवा द्रव साठल्याने पोट फुगल्यासारखे वाटणे. पोट घट्ट आणि सुजल्यासारखे जाणवते, काहीवेळा ते बाहेरूनही दिसते.
Ans: पचनादरम्यान अन्न तुटल्यावर वायू तयार होतो, जो पोटात साठतो.
Ans: पोट फुगणे आणि घट्ट वाटणे. अस्वस्थता, वेदना. मळमळ, छातीत जळजळ.






