लिव्हरमधील घाण क्षणार्धात होईल स्वच्छ! दिवसभरातून एकदा प्या 'या' लाल भाजीचा रस
गाजर रस पिण्याचे फायदे?
लिव्हरमधील घाण स्वच्छ करण्यासाठी उपाय?
कॅन्सर होण्याची कारणे?
देशभरात सगळीकडे वेगवेगळ्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कॅन्सर, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि हृद्यासंबंधित आजार झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. शरीरात होणाऱ्या बदलांकडे बऱ्याचदा व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने आजाराची लक्षणे वाढू लागतात आणि शरीराला गंभीर आजारांची लागण होते. लिव्हर शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. त्यामुळे लिव्हर स्वच्छ असणे आवश्यक आहे. लिव्हरच्या कार्यात निर्माण झालेले अडथळे पचनक्रियेवर होतो. सकाळी उठल्यानंतर गाजरचा रस प्यायल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर गाजर उपलब्ध असतात. गाजर शरीरासाठी सुपरफूड मानले जाते. यामध्ये विटामिन ए, बीटा-कॅरोटीन, पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे सॅलड म्हणून तुम्ही गाजर खाऊ शकता. नियमित गाजर खाल्ल्यास डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आजार होण्याचा धोका २५ टक्क्यांपर्यंत कमी होऊन जातो.गाजर केवळ डोळ्यांसाठीच नाहीतर रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी सुद्धा मदत करते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी गाजरचा रस प्यावा.
लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी गाजरचा रस प्रभावी ठरतो. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी एक ग्लास गाजर रस प्यायल्यास महिनाभरात त्वचेवर ग्लो येऊन चेहरा सुंदर दिसेल. गाजरचा रस चेहऱ्यासाठी स्किन सीरम प्रमाणे काम करते. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात. तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि काळे डाग घालवण्यासाठी गाजर रस फायदेशीर ठरेल. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
कमकुवत Liver, रक्ताची कमतरता; जास्त थंडीची जाणीव? बाबा रामदेवांनी सांगितले यामागील 5 भयावह आजार
राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. यामुळे थकवा, अशक्तपणा आणि आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गाजरच्या रसाचे सेवन करावे. गाजर रस नियमित प्यायल्यास कधीच थकवा, अशक्तपणा जाणवणार नाही. यामध्ये असलेले विटामिन ए, लोह आणि फोलेटचे प्रमाण अशक्तपणा कमी करते. सर्दी खोकला झाल्यानंतर नियमित गाजर रस प्यावा.
Ans: अत्यंत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, पोटाच्या उजव्या बाजूला वरच्या भागात दुखणे किंवा सूज येणे
Ans: अत्यधिक मद्यपान, औषधे आणि विषारी पदार्थ
Ans: शारीरिक तपासणी आणि वैद्यकीय इतिहास, लिव्हर बायोप्सी






