चवदार म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या 'या' पदार्थांमुळे वाढतो कॅन्सरचा धोका
कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरणारे पदार्थ?
कॅन्सर होऊ नये कोणती काळजी घ्यावी?
दैनंदिन आहारात खालेल्या पदार्थांचा शरीरावर होणारा परिणाम?
कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या पायाखालील जमीन सरकते. भारतासह जगभरात कॅन्सरच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. अपुरी झोप, वारंवार उद्भवणाऱ्या पचनाच्या समस्या, पोषक घटकांचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरास सहज पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे आहारात सेवन करावे. दैनंदिन आहारात झालेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. कॅन्सर झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते आणि शरीरात अनेक बदल दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आहारात चवदार म्हणून खाल्लेले जाणारे कोणते पदार्थ कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
सफेद साखर, ब्राऊन शुगर की गुळ… आरोग्यासाठी काय आहे सर्वाधिक फायदेशीर
चहा बनवण्यासाठी किंवा इतर गोड पदार्थ बनवण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी साखर वापरली जाते. पण सतत साखरेचे सेवन करणे शरीरासाठी अतिशय धोक्याचे ठरते. आधुनिक काळात साखर स्लो पॉयझन मानली जाते. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर ज्यामुळे शरीरात कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढून आरोग्य बिघडते. साखरेचे सेवन केल्यामुळे वाढणारा लठ्ठपणा कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतो.
दैनंदिन आहारात चविष्ट म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या मैद्याच्या पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. मैदा बनवताना त्यातील सर्व फायबर्स काढून टाकले जातात. याशिवाय मैदा पांढरा करण्यासाठी ऑलॉक्सॉन सारख्या रसायनांचा वापर केला जातो. तसेच मैदा खाल्ल्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढते. त्यामुळे दैनंदिन आहारात मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे अतिसेवन करू नये.
काहींना सतत बाहेरचे तिखट आणि तेलकट पदार्थ खाण्याची खूप जास्त सवय असते. वारंवार उकळल्या तेलात एक्रिलामाईड नावाचे घातक रसायन तयार होते. फूड एण्ड एग्रीकल्चर ऑर्गनायजेशनमध्ये देण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, उच्च तापमानाला गरम केलेल्या पिष्टमय पदार्थांमध्ये एक्रिलामाईड तयार होते, जे शरीरासाठी अतिशयव घातक मानले जाते.
थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं गरमागरम पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण अतिगरम पदार्थांचे सेवन करणे शरीरासाठी धोक्याचे ठरते. गरम पदार्थांच्या सेवनामुळे अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते. गरम पेयांचे सेवन केल्यामुळे अन्ननलिकेतील नाजूक आवरणाला इजा होऊन आरोग्य बिघडून जाते.
Ans: शरीरातील पेशींची अनियंत्रित आणि असामान्य वाढ म्हणजे कर्करोग.
Ans: शरीरात नवीन गाठ येणे किंवा जुन्या गाठीचा आकार बदलणे.
Ans: धूम्रपान, मद्यपान, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव.






