Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

200 कोटी लोकांच्या लिव्हरमध्ये भरलेत घाणेरडे फॅट्स, 4 पदार्थ खाऊन आजाराला करा छुमंतर

जर लठ्ठपणा वाढत राहिला आणि यकृत खराब झाले तर NAFLD नंतर NASH आणि सिरोसिस सारखे गंभीर आजारदेखील होऊ शकतात. अशावेळी काय करावे जाणून घ्या तज्ज्ञांकडून

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 23, 2025 | 06:36 PM
फॅटी लिव्हर असल्यास काय खावे (फोटो सौजन्य - iStock)

फॅटी लिव्हर असल्यास काय खावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

लोक अनेकदा मधुमेह, हृदयरोग किंवा लठ्ठपणामुळे होणाऱ्या सांध्याच्या समस्यांबद्दल बोलतात, परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की जास्त वजन तुमच्या यकृतावरही परिणाम करते. यकृत अर्थात लिव्हर आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे, अन्न पचवण्याचे आणि पोषक तत्वांचा साठा करण्याचे काम करते. फॅटी लिव्हर हा एक जीवनशैलीचा आजार आहे जो अत्यंत धोकादायक असू शकतो. हा आजार अस्वास्थ्यकर आणि चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने होतो. अल्कोहोलमुळे हा आजार धोकादायक बनू शकतो आणि यकृताचा कर्करोग देखील होऊ शकतो. जगातील लाखो लोकांना फॅटी लिव्हरची समस्या आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की यकृताचे डॉक्टर ते टाळण्यासाठी काय खातात?

लिव्हरतज्ज्ञ डॉ. सौरभ सेठी यांनी लिव्हरचे आरोग्य सुधारण्यासाठी ४ स्नॅक्स खाण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी सांगितले की ते स्वतः दर आठवड्याला ते खातात. ते पुढे म्हणाले की जगातील सुमारे २०० कोटी लोकांना फॅटी लिव्हरचा आजार आहे आणि याचे सर्वात मोठे कारण खराब अन्न आहे. मात्र यासाठी नक्की काय करायला हवे यासाठी तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock) 

बेरीजसह दही

दह्यात बेरीज मिक्स करून खावे

फॅटी लिव्हर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही घरगुती उपाय म्हणून दह्यासह बेरीज खाऊ शकता. यातील प्रोबायोटिक आणि अँटीऑक्सिडंट्स तुमची फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यास मदत करते. याशिवाय गट आणि लिव्हर हेल्थ सुधारण्यासाठी दही आणि बेरीज हे समीकरण उत्तम ठरते. फॅटी लिव्हरची समस्या लवकर कमी करण्यास हे खाणे उपयुक्त ठरते. 

फक्त दारूच नाही तर 5 पदार्थांनी सडते लिव्हर, होऊ शकतो Fatty Liver चा त्रास; सकाळी काय खावे?

खजूर खाणे फायद्याचे 

खजूर आणि अक्रोड समीकरण ठरेल उत्तम

खजूर हे अँटीऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस मानले जाते. डॉक्टर अक्रोड आणि खजूर एकत्र खाण्याचा सल्ला देतात. अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असून खजूर आणि अक्रोड हे दोन्ही अत्यंत हेल्दी स्नॅक मानले जाते. तुमचे पोट लवकर भरते आणि याशिवाय एनर्जीही राहते. फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. 

मिक्स नट्स आणि डार्क चॉकलेट्स 

डार्क चॉकलेटसह नट्स मिक्स करून खावे

मिक्स नट्समध्ये विटामिन ई चा चांगला स्रोत आहे आणि हे तुमच्या लिव्हरच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तसंच लिव्हर चांगले राखण्यासाठी डार्क चॉकलेट खाणेही फायदेशीर ठरते. डार्क चॉकलेट आणि नट्स एकत्र करून खाल्ल्याने फॅटी लिव्हरची सूज कमी होण्यास मदत होते आणि लिव्हर हेल्दी राहण्यास मदत मिळते. 

Fatty Liver करू नका दुर्लक्षित, Grade 2 स्थिती असल्यास टाळा ‘हे’ पदार्थ; वाढेल त्रास

सफरचंद, दालचिनी आणि मध 

सफरचंद ठरतील फायदेशीर

सफरचंद आणि दालचिनीसह मध मिक्स करून त्याचे सेवन करावे. सफरचंद खाल्ल्याने लिव्हरसह गट हेल्थदेखील चांगली राहते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलांना हे खाणे अधिक आवडते. हे स्नॅक्स आपले लिव्हर चांगले ठेवण्यासाठी आणि फॅटी लिव्हरच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी तुम्ही नियमित खाऊ शकता. 

काय आहे लिव्हरसाठी हेल्दी स्नॅक्स?

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Experts shared 4 snacks to reduce fatty liver naturally 2 billion suffering says lancet study

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 06:36 PM

Topics:  

  • Fatty Liver
  • Health News
  • lifestyle news

संबंधित बातम्या

वयाच्या तिशीतच चेहऱ्याची त्वचा लटकायला लागलीये? मग स्वयंपाकघरातील या लहान बियांचा वापर करा; काही दिवसांतच फरक दिसेल
1

वयाच्या तिशीतच चेहऱ्याची त्वचा लटकायला लागलीये? मग स्वयंपाकघरातील या लहान बियांचा वापर करा; काही दिवसांतच फरक दिसेल

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
2

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Cholesterol Remedy: नसांमध्ये चिकटलेली चरबी ‘ही’ भाजी खाऊन झटकन वितळेल, वाढेल नैसर्गिक गुड कोलेस्ट्रॉल
3

Cholesterol Remedy: नसांमध्ये चिकटलेली चरबी ‘ही’ भाजी खाऊन झटकन वितळेल, वाढेल नैसर्गिक गुड कोलेस्ट्रॉल

वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय रडारड, चिडचिडेपणाची समस्या; पालकांनी वेळीच घाला आवर
4

वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय रडारड, चिडचिडेपणाची समस्या; पालकांनी वेळीच घाला आवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.