उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 'या' कारणांमुळे उद्भवतात डोळ्यांसंबंधित समस्या
राज्यभरात सगळीकडे कडक ऊन पडू लागले आहे. वाढत्या उन्हाळ्यात शरीराचा बचाव करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. उन्हाळा वाढल्यानंतर शरीर डिहायड्रेट होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीर थंड राहते. याशिवाय अनेक समस्यांपासून आराम मिळतो. उन्हाळ्यामध्ये आरोग्यासोबतच त्वचा, केस आणि डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्य त्वचेसोबतच डोळ्यांच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर डोळ्यांमध्ये कोरडेपणा, खाज, जळजळ आणि थकवा इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या लहान वाटणाऱ्या समस्या कालांतराने मोठ्या होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य-istock)
केवळ पाण्याच्या सेवनाने शरीर हायड्रेट होते हा निव्वळ गैरसमज, क्रिकेटर ऋतुराज गायकवाडने दिला सल्ला
डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवण्यामागे अनेक कारण आहेत. उन्हाळयात सतत एसीमध्ये बसून राहणे, कोरड्या हवेमध्ये वेळ घालवणे, पाणी कमी पिणे आणि सतत स्क्रीनकडे पाहणे इत्यादी गोष्टींचा परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डोळ्यांसंबंधित समस्या नेमक्या कशामुळे उद्भवतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये अनेकांना एसीमध्ये बसण्याची किंवा झोपण्याची सवय असते. मात्र सतत एसीच्या सानिध्यांत राहिल्यामुळे डोळे कोरडे पडून जातात. एसी आणि कुलरमधील हवेमध्ये आर्द्रता कमी असते, ज्यामुळे एसीच्या आजूबाजूला राहिल्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवू लागतो. तसेच कोरड्या हवेमुळे डोळ्यांमधील नैसर्गिक अश्रुंचे प्रमाण कमी होते आणि डोळे कोरडे होऊन जातात. डोळे कोरडे झाल्यानंतर जळजळ, खाज आणि लालसरपणा इत्यादी समस्या उद्भवू लागतात.
कडक उन्हामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा आणि जळजळ होण्याची शक्यता असते. उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर डोळे अतिशय लाल होऊन जातात. याशिवाय काहींच्या डोळ्यातून सतत पाणी येऊ लागते. उन्हाची अतिनील किरणे डोळ्यांची गुणवत्ता खराब करून टाकते. त्यामुळे घराबाहेर पडताना डार्क गॉगल्स किंवा चष्मा लावणे आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांचे रक्षण होईल.
केवळ पाण्याच्या सेवनाने शरीर हायड्रेट होते हा निव्वळ गैरसमज, क्रिकेटर ऋतुराज गायकवाडने दिला सल्ला
शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डोळ्यांमधून पाणी येणे किंवा डोळे लाल होणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. शरीर डिहायड्रेट झाल्यामुळे डोळे अतिशय कोरडे होऊन जातात. डोळ्यांमध्ये जळजळ वाढू लागते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्याल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. लिंबू सरबत, फळांचे रस, नारळपाणी आणि ताक इत्यादी पेयांचे सेवन करावे.