केवळ पाण्याच्या सेवनाने शरीर हायड्रेट होते हा निव्वळ गैरसमज
होळी हा सण आनंद आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. शरीरात पाणी आणि क्षार यांचे संतुलित प्रमाण असेल तरच होळीची मजा अनुभवता येते. क्रिकेटपटू म्हणून मला माहिती आहे की, पाणी प्यायल्याने शरीराला हायड्रेशन मिळत नाही. शरीराला पाण्यासह पुरेसे क्षारही मिळायला हवेत. खेळाच्या मैदानावर किंवा तळपत्या उन्हात होळी साजरी करताना तुमच्या शरीराला पुरेसे पाणी किंवा क्षार मिळाले नाही तर थकवा जाणवू शकतो. हायड्रेटेड राहा, शरीरातील क्षारांचे प्रमाण (इलेक्ट्रोलाइट्स)चे प्रमाण योग्य राखा आणि तुमची उर्जा नियमित करा. तुमच्या शरीरात पुरेशी उर्जा असेल तर होळी उत्साहाने साजरी करता येते. (फोटो सौजन्य – iStock)
एन्सेफलायटीस म्हणजे काय? एन्सेफलायटीस झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय
डिहायड्रेशन ही एक सामान्य पण दुर्लक्षिलेली आरोग्याशी संबंधित समस्या आहे. धावपळीच्या जीवनशैलीत गुंतलेल्या तब्बल ७५ टक्के लोकांना डिहायड्रेशनच्या समस्येने ग्रासले आहे. कामाचे वाढते तास, तापमानवाढ, शरीरात वाढणारे कॅफिनचे प्रमाण, मद्यपान यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण घटते. शरीरात पुरेसे पाणी नसेल तर माणसाच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
सतत व्यायाम करुन फिट राहण्याकडे भर देणारे खेळाडू असोत वा तीव्र उन्हांच्या झळांचा सामना करणारे डिलिव्हरी व्यावसायिक असोत. या दोन्ही व्यवसायातील माणसांप्रमाणेच कौटुंबिक जबाबदा-या सांभाळणा-या पालकांनाही आपले आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. याकरिता शरीरात पुरेसे पाणी आणि क्षार असल्यास त्यांच्या शरीरात ऊर्जा टिकून राहते. दैनंदिन काम करण्याची क्षमता चांगली राहते. शरीरातील हायड्रेशनची पातळी कमी झाली तर थकवा, स्नायू दुखणे, चक्क येणे अशा शारिरीक समस्या उद्भवतात. बरेचदा माणसाची निर्णय क्षमतेवरही त्याचा परिणाम जाणवतो.
होळीच्या सणात हायड्रेशनची समस्या प्रामुख्याने जाणवते. कित्येकजण तळपत्या उन्हात सतत उभे राहत होळी साजरी करण्यात मशगुल असतात. उन्हाचे चटके, सणासुदीच्या काळात वेगवेगळ्या चवदार पदार्थांच्या सेवनाने शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत जाते. तासनतास उभे राहत सण साजरा करतानाच थकवा, डोकेदुखी किंवा चक्कर येते. होळी साजरी केल्यानंतरही या आरोग्याच्या समस्या सुरुच राहतात. या उत्सकाळात येणारा थकबा हा डिहायड्रेशनमुळे आल्याचे बरेचजणांना ज्ञातही नसते. कित्येकजण हा दररोजच्या कामकाजांमुळे थकवा आल्याचा गैरसमज बाळगातात. या सणवारात कामकाजाचा व्याप सांभाळणा-या महिलांनी हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे.
केवळ पाणी प्यायल्याने शरीराला हाडड्रेशन मिळते हा गैरसमज आहे. शारिरीक हालचाली आणि घामामुळे शरीरात क्षाराचे प्रमाण घटते. केवळ पाणी प्यायल्याने शरीरातील क्षारांचे प्रमाण भरुन येत नाही. तुमच्या शारिरीक हालचालींनुसार क्षारांचे प्रमाण कमी-जास्त होत राहते. व्यायाम केल्याने किंवा होळी साजरी केल्यानंतर शरीरातील क्षारांचे घटलेले प्रमाण वेगवेगळे असते. सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे क्षार शरीराचे संतुलन परत मिळवण्यास, सुस्ती टाळण्यात तसेच ऊर्जा परत मिळवून देण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
सतत तहान लागणे, कोरडी त्वचा, डोकेदुखी किंवा हृदयाचे ठोके वाढणे ही डिहायड्रेशनची लक्षणे आहेत. ही लक्षणे वेळीच ओळखा. पाणी आणि क्षारांचे सेवन करा जेणेकरुन आरोग्याच्या समस्या टाळता येतील. तुम्ही खेळपट्टीवर असाल, कामावर असाल किंवा सण साजरा करण्यात गुंतलेले असाल या सर्व घडामोडींत शरीरातील डायड्रेशनची पातळी संतुलित राहायला हवी. तरच शरीराला पुरेशी उर्जा मिळते आणि आरोग्याची निगाही राखली जाते. सणवारात किंवा एखाद्या गंभीर परिस्थितीला सामोरे जातानाही प्रत्येकाने शरीरात डायड्रेशनची पातळी अबाधित राखायला हवी.