कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग 'हे' घरगुती उपाय नक्की करा
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे त्वचेची जास्त काळजी घ्यावी. सतत धूळ, माती आणि प्रदूषण इत्यादींच्या सानिध्यात दीर्घकाळ राहिल्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होते. सर्वच महिलांना त्वचा कायमच सुंदर आणि चमकदार हवी असते. सुंदर त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. स्किन केअर रुटीन, फेसपॅक, फेसमास्क किंवा इतर कोरियन स्किन केअर रुटीन फॉलो करून त्वचेची काळजी घेतली जाते. त्वचेच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्यानंतर त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते. पण कालांतराने त्वचा पुन्हा होती तशीच होऊन जाते. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे आहारात कायमच हेल्दी पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
हल्ली तरुण वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या, पिंपल्स, बारीक पुरळ, लाल रॅश इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. पण असे न करता त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. कमी वयातच चेहऱ्यावर दिसून येणाऱ्या सुरकुत्यांमुळे त्वचा अतिशय वयस्कर आणि निस्तेज वाटू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्वचा आणि केस कायमच निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी आहारात बदल करणे गरजेचे आहे.
त्वचा कायमच सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. त्यातील अतिशय महत्वाचा पदार्थ म्हणजे तूप. जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना तुपाचा वापर केला जातो. तुपामध्ये असलेले गुणकारी घटक शरीर आतून हायड्रेट ठेवतात. रोजच्या आहारात थोडेसे तरी तूप खावेच. यामुळे त्वचेचे सौंदर्य कायम टिकून राहते. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात तूप मिक्स करून उपाशी पोटी सकाळी प्यावे. यामुळे त्वचा आणि आरोग्य कायमच निरोगी राहते. तुपाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये चिटकून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर डिटॉक्स होते. त्वचा हायड्रेटेड आणि मॉईश्चराईज होण्यासाठी तूप खाणे अतिशय महत्वाचे आहे. त्वचेची लवचिकता वाढवण्यासाठी तूप खावे.
लाडू बनवण्यास अळशीच्या बियांचा वापर केला जातो. यामध्ये असलेल्या घटकांमुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय त्वचेवर आलेल्या बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. यासाठी कढईमध्ये अळशीच्या भाजून घ्या. त्यानंतर अळशीच्या बियांची तयार केलेली पावडर गँसवर पाणी घालून गरम करून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर तयार केलेले पाणी गाळून घ्या. त्यानंतर पाण्यात बदाम तेल टाकून मिक्स करा आणि त्वचेवर हलक्या हाताने मसाज करून घ्या. यामुळे चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.