Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावरील पिंपल्स होतील ७ दिवसांमध्ये गायब! लवंग पाण्याच्या टोनरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल आतून स्वच्छ

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स घालवण्यासाठी लवंग टोनरचा वापर करावा. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यासोबतच चमकदार होते. चला तर जाणून घेऊया लवंग टोनर बनवण्याची कृती आणि फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 20, 2026 | 09:44 AM
चेहऱ्यावरील पिंपल्स होतील ७ दिवसांमध्ये गायब! लवंग पाण्याच्या टोनरचा 'या' पद्धतीने करा वापर, त्वचा होईल आतून स्वच्छ

चेहऱ्यावरील पिंपल्स होतील ७ दिवसांमध्ये गायब! लवंग पाण्याच्या टोनरचा 'या' पद्धतीने करा वापर, त्वचा होईल आतून स्वच्छ

Follow Us
Follow Us:

प्रत्येकाला आपली त्वचा कायमच सुंदर आणि चमकदार हवी असते. चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिंपल्स, मुरूम आणि ऍक्ने घालवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी स्किन केअरमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी केला जातो. पण प्रदूषण आणि वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा खूप जास्त निस्तेज होऊन जाते आणि चेहऱ्यावर मोठे पिंपल्स येतात. पिंपल्स आल्यानंतर ते लवकर कमी होत नाही. काहीवेळा पिंपल्स फुटून जातो आणि चेहऱ्यावर काळे डाग तसेच राहतात. उन्हाळ्यात त्वचा टॅन होऊन काळी पडते. सतत येणाऱ्या घामामुळे त्वचेवर चिकटपणा वाढतो आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होण्यास सुरुवात होते.(फोटो सौजन्य – istock)

Skin Care Mistakes: स्किनकेअरमध्ये ‘या’ चुका करताय? आजच टाळा, नाहीतर त्वचेचे होईल मोठे नुकसान

त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर बारीक मुरूम येतात. हे मुरूम काही केल्या लवकर कमी होत नाही.त्यामुळे त्वचेची काळजी घेताना योग्य स्किन केअर रुटीन फॉलो करणे फार आवश्यक आहे. पिंपल्स आल्यानंतर पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट घेऊन त्वचा सुंदर आणि चमकदार केली जाते. पण काही काळानंतर पुन्हा एकदा त्वचा काळवंडून जाते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी लवंग टोनरचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला लवंग टोनर बनवण्याची कृती आणि यामुळे त्वचेला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

लवंग टोनर वापरण्याची कृती:

बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे टोनर उपलब्ध आहेत. पण त्वचा स्वच्छ करण्यासाठी कायमच महागड्या टोनरची आवश्यकता नाही. छोटीशी लवंगसुद्धा त्वचेच्या सौंदर्यात भर घालते. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म चेहऱ्यावर आलेले पिंपल्स मुळांपासून स्वच्छ करण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती पदार्थांपासून बनवलेल्या टोनरचा वापर करावा. टोनरचा वापर केल्यामुळे त्वचा हायड्रेट होण्यासोबतच डाग सुद्धा कमी होतात.

उन्हामुळे त्वचा खूप जास्त टॅन झाला आहे? मग या पद्धतीने चेहऱ्यावर लावा कच्चे दूध, सकाळी उठताच त्वचेवर दिसेल ग्लो

टोपात एक किंवा दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्यात ५ ते ६ लवंग टाकून पाण्याला व्यवस्थित उकळी काढा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून टोपातील पाणी पूर्णपणे थंड करा. पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. तयार केलेल्या टोनरचा तुम्ही आठवडाभर वापर करू शकता. टोनर वापरण्याआधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून कोरडा करा. त्यानंतर चेहऱ्यावर टोनर मारून काहीवेळ तसेच ठेवा. रात्रभर टोनर त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करेल. आठवडाभर नियमित टोनरचा वापर केल्यास चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी होण्यासोबतच त्वचा स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावरील चमक वाढेल. यामध्ये असलेल्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे काळे डाग, वांग आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Facial pimples will vanish in 7 days use clove water toner this way to cleanse your skin from within

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
2

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
4

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.