त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून अनेक वेळा चेहरा धुण्याची सवय काही लोकांना असते. मात्र यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते. परिणामी त्वचा कोरडी, संवेदनशील आणि निस्तेज दिसू शकते.
अनेकजण केवळ उन्हाळ्यातच सनस्क्रीन वापरतात. मात्र सूर्याची अतिनील किरणे वर्षभर त्वचेवर परिणाम करत असतात. सनस्क्रीन न वापरल्यास टॅनिंग, पिग्मेंटेशन आणि अकाली सुरकुत्यांचा धोका वाढतो.
मेकअप किंवा सनस्क्रीनसह झोपल्याने त्वचेची पोअर्स बंद होऊ शकतात. त्यामुळे मुरुम, ब्लॅकहेड्स आणि त्वचेची जळजळ वाढण्याची शक्यता असते.
तेलकट त्वचा असल्यामुळे अनेकजण मॉइश्चरायझर वापरत नाहीत. मात्र त्वचेला योग्य आर्द्रता मिळाली नाही तर ती अधिक तेल तयार करू शकते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या वाढू शकतात.
त्वचा लवकर सुधारावी या उद्देशाने अनेक प्रोडक्टस एकाच वेळी वापरणे धोकादायक ठरू शकते. यामुळे त्वचेवर लालसरपणा, खाज आणि जळजळ होण्याचा धोका असतो.
मुरुम दाबल्याने डाग पडू शकतात, तर खूप गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. यामुळे त्वचा अधिक कोरडी आणि संवेदनशील बनते.
उशीचे कव्हर, टॉवेल आणि मेकअप ब्रश वेळेवर स्वच्छ न केल्यास त्यामध्ये जीवाणू वाढतात. हे जीवाणू त्वचेच्या संपर्कात आल्यावर मुरुम आणि इतर संसर्गजन्य समस्या निर्माण होऊ शकतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Health Tips: भात खाणं बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या फायदे आणि तोटे






