फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांनी 'ही' पेय पिऊ नये
सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्यसंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पावसाळा सुरु झाल्यानंतर बाहेरचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे, अन्यथा पोट दुखी, जुलाब, गेस्ट्रो आणि पोटासंबंधित आजार होण्याची शक्यता असते. हे आजार झाल्यानंतर शरीराचे गंभीर नुकसान होते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यकृतावर परिणाम करतात. अनेक लोक मोठ्या उत्साहाने बाहेर मिळणारे ड्रिंक आणि इतर पेय पितात. यामुळे अनेकदा फॅटी लिव्हरची समस्या वाढू लागते. तसेच शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फॅटी लिव्हरच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी आहारात कोणत्या पेयांचा समावेश करू नये, याबद्दलसविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांनी सोडा आणि सॉफ्ट ड्रिंक पिणे टाळले पाहिजे. अन्यथा फॅटी लिव्हरची समस्या आणखीन वाढू शकते. सोडा आणि सॉफ्ट ड्रिंकमध्ये जास्त प्रमाणात साखर आणि फ्रक्टोजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास असलेल्या लोकांनी सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंक पिऊ नये.
हे देखील वाचा: पावसात भिजल्यामुळे उद्भवू शकतात आरोग्यसंबंधित ‘हे’ गंभीर आजार,जाणून घ्या सविस्तर
फॅटी लिव्हरच्या त्रास असलेले रुग्ण ताज्या फळांचा रस पिऊ शकता, पण रस प्यायल्यामुळे आरोग्यसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. यकृतातील चरबीचे प्रमाण वाढल्यानंतर पोट दुखीचा त्रास होण्यास सुरुवात होते. तसेच नॉन-अल्कोहोलिक लोकसुद्धा फॅटी लिव्हरचे रुग्ण बनू शकतात.
फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांनी बिअर पिऊ नये. बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण मद्यापेक्षा कमी असते. तसेच हॅमबर्गरपेक्षा कॅलरीजचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे बिअर पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
हे देखील वाचा: चेहरा निर्जीव आणि कोरडा झाला आहे? मग आहारात करा ‘या’ विटामिन सी युक्त पेयांचा समावेश
अनेकांना दिवसभरातून 4 ते 5 वेळा चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण चुकीची सवय आहे. या सवयीचा यकृतावर गंभीर परिणाम होतो. कॉफीमध्ये असलेले कॅफिनयुक्त पेये यकृत आणखी कमकुवत करून टाकते. त्यामुळे तुम्ही चहा कॉफीऐवजी हर्बल टी पिऊ शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.