पावसाळ्यातील आजार
राज्यभरात सगळीकडे पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर सगळीकडे रोगराई सुद्धा पसरते. रोगराई पसरल्यामुळे आजार वाढू लागतात. पावसात भिजायला सगळ्यांचं आवडत. या दिवसांमध्ये लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पावसात भिजण्याचा छान आनंद घेतात. पण पावसात भिजून आल्यानंतर आजारी पडण्याची शक्यता असते. सर्दी, खोकला, साथीचे आजार झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत होण्यास सुरुवात होते. वातावरणातील आद्रतेचा परिणाम रोग्यावर लगेच दिसून येतो. सतत घाम येण्यास सुरुवात झाल्यानंतर आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणते आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
वातावरणातील आद्र्रता, दूषित हवा, खराब पाणी इत्यादींमुळे आजार वाढू लागतात. हवेतील दूषित कण पाण्यात मिक्स झाल्यामुळे न्यूमोनिया, दमा आणि ब्राँकायटिस यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. यामुळे तुम्हाला वारंवार श्वसनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पावसात भिजणे टाळावे. पावसात भिजून आल्यानंतर जर तुम्हाला श्वसनाचा त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत.
पावसात भिजून आल्यानंतर त्वचा रोग होण्याची दाट शक्यता असते. वातावरणातील ओलाव्यामुळे जीवाणू, विषाणू आणि बुरशीजन्य आजार वाढण्याची शक्यता असते. यामुळे त्वचेवर पुरळ, ॲलर्जी आणि त्वचारोग यांसारख्या समस्या जाणवण्याची शक्यता असते. हे संसर्ग होऊ नये म्हणून पावसाळ्यात भिजणे टाळावे.
हायपोथर्मिया म्हणजे शरीर ओल झाल्यानंतर शरीराच्या तापमानात घट होणे. जास्त वेळ पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे शरीरातील तापमानात घट होण्यास सुरुवात होते. थरथरणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. या समस्या जाणवू लागल्यानंतर तात्काळ डॉक्टरांच्या मदतीने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा: डायबिटीज असणाऱ्या व्यक्तीने किती वेळा ब्लड शुगर चेक केली पाहिजे? जाणून घ्या योग्य पद्धत
पावसाळ्याच्या घाणेरड्या पाण्यामुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. हे पाणी चुकूनही तोंडात गेल्यानंतर ताप, पोटदुखी, डोळे लाल होणे, पोटदुखी, मळमळ आणि त्वचेवर पुरळ इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. दूषित पाणी नाका तोंडात गेल्यानंतर लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता असते.