शरीरामध्ये विटामिन सी हे महत्वाचे जीवनसत्व आहे. या जीवनसत्वाची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्यसंबंधित समस्या उद्भवू लागतात. शरीरातील विटामिन सी ची पातळी भरून काढण्यासाठी आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. विटामिन सी ची कमतरता जाणवू लागल्यानंतर हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचा निर्जीव दिसणे, कोलेजनचे उत्पादन कमी होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कोणत्या पेयांचा समावेश करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य-istock)
विटामिन सी युक्त पेय
शरीरातील विटामिन सी ची कमतरता भरून काढण्यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू आणि पुदिन्याचे पाणी शरीरातील उष्णता कमी करून शरीराला थंडावा देण्याचे काम करते.
Untitled design (89)
संत्र्यामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे आरोग्यसाठी गुणकारी आहे. त्यामुळे शरीरातील विटामिन सी ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात संस्त्र्याच्या रसाचे सेवन करावे.
अननसामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे प्यायल्याने त्वचेचा हरवलेला रंग पुन्हा परत मिळवण्यासाठी मदत होते. रोज पाइन ॲपल ज्यूस प्यायल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात.
आवळ्याच्या रसामध्ये भरपूर विटामिन सी असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी तुम्ही आवळ्याचा रस पिऊ शकता. तसेच यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.