
बद्धकोष्ठतेच्या त्रासाने कंटाळला आहात? मग कोमट दुधात मिक्स करून प्या 'हा' पदार्थ, सकाळी उठल्यानंतर पोट होईल स्वच्छ
बद्धकोष्ठता होण्याची कारणे?
कोमट दुधात कोणता पदार्थ मिक्स करून प्यावा?
पचनक्रिया सुधरण्यासाठी उपाय?
दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे पचनक्रिया बिघडण्याची खूप जास्त शक्यता असते. कधी तिखट, तेलकट तर काहीवेळा अतिप्रमाणात आंबट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडते. त्यामुळे आंबट ढेकर, उलट्या, मळमळ, गॅस आणि अपचन होते. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, फोड तर काहीवेळा अंगाला खाज येते. सकाळच्या वेळी पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. पोटात जडपणा, गॅस, अपचन होते आणि खाल्लेले अन्नपदार्थ विरुद्ध दिशेने पुन्हा परत येते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढत्या बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी कोमट दुधात कोणते पदार्थ मिक्स करून प्यावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
दैनंदिन आहारात फायबर युक्त पदार्थांचे कमीत कमी प्रमाणात सेवन केल्यामुळे आतड्यांमधील मल कोरडा आणि कडक होऊन जातो. तर सर्वच ऋतूंमध्ये शरीराला पाण्याची खूप जास्त आवश्यकता असते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर सगळ्यात पहिला परिणाम पचनक्रियेवर होतो. कमी पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमधील मल पुढे सरकण्यास अडथळा निर्माण होतात. बद्धकोष्ठता झाल्यानंतर दोन किंवा तीन दिवस शौचास न होणे, मलविसर्जन करताना खूप जोर द्यावा लागणे, पोट पूर्णपणे साफ न झाल्यासारखे वाटणे, पोटात गॅस झाल्यासारखा वाटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.
बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी एक ग्लासभर दुधात दोन चमचे तूप मिक्स करून प्यावे. हा उपाय रात्री झोपण्याआधी करावा. यामुळे शरीर स्वच्छ होण्यासोबतच आतड्यांची हालचाल सक्रिय राहते. कोमट दूध प्यायल्यामुळे अपचनाचा कोणताही त्रास होत नाही. दुधात असलेले कॅल्शियम युक्त घटक पचनक्रिया सुधारण्यासोबतच हाडे आणि स्नायू मजबूत करण्यास मदत करते. दुधात विटामिन, प्रोटीन्ससोबतच इतर आवश्यक खनिजे सुद्धा आढळून येतात. त्यामुळे नियमित झोपण्याआधी एक ग्लासभर कोमट दूध प्यावे.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एक ग्लासभर दुधात तूप मिक्स करून प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. आतड्यांच्या मांसपेशींना आराम देण्यासाठी भरपूर पाणी आणि फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय रिकाम्या पोटी वाटीभर पपई खाल्ल्यास पोट स्वच्छ होण्यास मदत होईल. कलिंगड, सफरचंद, पेरू,चिक्कू अशा हंगामी फळांचा रोजच्या आहारात समावेश करावा. यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात.
Ans: मल त्याग करताना त्रास होणे, शौचास उशीर लागणे किंवा पोट पूर्ण साफ न झाल्यासारखे वाटणे याला बद्धकोष्ठता म्हणतात.
Ans: काही पदार्थ पचनक्रिया सुधारण्यास आणि मल मऊ होण्यास मदत करू शकतात. मात्र प्रत्येक व्यक्तीचा शरीरावर होणारा परिणाम वेगळा असू शकतो.
Ans: सतत बद्धकोष्ठता, पोटदुखी, रक्तस्राव किंवा वजन कमी होणे अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.