Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन

शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. यामुळे लोहाची पातळी भरून निघेल आणि तुम्ही कायमच निरोगी राहाल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 12, 2026 | 05:30 AM
रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी 'या' पदार्थांचा करा सेवन

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी 'या' पदार्थांचा करा सेवन

Follow Us
Close
Follow Us:

रक्ताची कमतरता कशामुळे निर्माण होते?
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय खावे?
हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर दिसणारी लक्षणे?

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीरात विटामिनसोबतच रक्ताची पातळी सुद्धा योग्य प्रमाणात असणे फार आवश्यक आहे. शरीरात योग्य प्रमाणात रक्त नसेल तर आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. रक्ताची पातळी कमी होण्याला वैद्यकीय भाषेत ॲनिमिया असे म्हंटले जाते. शरीराला आवश्यक असलेली लोहाची पातळी कमी झाल्यानंतर खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. पण काहीवेळा अतिशय सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. रक्तात हिमोग्लोबीनची कमतरता निर्माण झाल्यानंतर दुर्लक्ष केल्यास शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला रक्तात निर्माण झालेली हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ आरोग्य सुधारण्यास मदत करतील.(फोटो सौजन्य – istock)

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील ‘हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण

रक्ताची पातळी कमी होण्याची कारणे:

  • फॉलिक ऍसिडची कमतरता
  • शरीरातून जास्त रक्तस्त्राव होणे
  • जुनाट गंभीर आजार
  • अयोग्य आहार
  • गर्भधारणा
  • अस्थिमज्जाशी संबंधित विकार

रक्त वाढवण्यासाठी नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ:

दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि इतर फळ भाज्यांचे सेवन करावे. भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर विटामिन मिळतात आणि आरोग्य चांगले राहते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पालक आणि मेथीची भाजी खावी. पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते, जे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. लाल रक्त पेशी वाढवण्यासाठी डाळिंब, सफरचंद आणि बीट नियमित खावे. महिनाभर नियमित बीटरूट खाल्ल्यास रक्ताची कमतरता भरून निघेल आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल.

शरीराला नैसर्गिकरित्या लोह वाढवण्यासाठी खजूर, मनुका आणि बदामइत्यादी पदार्थ नियमित खावे. मटकी, चणे, मोड आलेली कडधान्य इत्यादी पदार्थांमध्ये खूप जास्त लोह असते. गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आणि थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी एक मूठभर चणे आणि गूळ एकत्र मिक्स करून खावे. यामध्ये असलेले आवश्यक घटक शरीराला पोषण देतात आणि हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.

महिलांमध्ये PCOD, PCOS च्या समस्या का वाढत आहे? शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

संत्री किंवा लिंबू इत्यादी आंबट फळांमध्ये भरपूर विटामिन सी असते. विटामिन सी युक्त फळे खाल्ल्यामुळे शरीर निरोगी राहते आणि हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. वाळवलेले अंजीर आणि जर्दाळूमध्ये खूप जास्त लोह असते. नियमित सकाळी उठल्यानंतर २ भिजवलेले अंजीर आणि जर्दाळू खाल्ल्यास महिनाभरात रक्ताची पातळी वाढेल. केवळ घरगुती पदार्थांचे सेवन करून नाहीतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे सुद्धा फार आवश्यक आहे. शरीरसंबंधित इतर गंभीर आजारांमुळे सुद्धा रक्ताची पातळी झपाट्याने कमी होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिमोग्लोबीन कमी झाल्याची लक्षणे कोणती असतात?

    Ans: सतत थकवा येणे, अशक्तपणा, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, त्वचा फिकट दिसणे आणि डोकेदुखी ही हिमोग्लोबीन कमी झाल्याची सामान्य लक्षणे असू शकतात.

  • Que: शरीरातील लोहाची कमतरता का निर्माण होते?

    Ans: अपुरा आहार, रक्तस्राव, मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्राव, गर्भधारणा किंवा शरीरात लोह शोषले न जाणे यामुळे लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते.

  • Que: व्हिटॅमिन C चा हिमोग्लोबीनशी काय संबंध आहे?

    Ans: व्हिटॅमिन C शरीरात लोहाचे शोषण वाढवण्यास मदत करते. त्यामुळे संत्री, लिंबू, आवळा यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश फायदेशीर ठरू शकतो.

Web Title: Feeling tired due to low hemoglobin levels in the blood consume these foods to replenish iron levels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • fruits for hemoglobin
  • Health Care Tips
  • Healthy Foods

संबंधित बातम्या

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
1

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील ‘हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण
2

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील ‘हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण

रोजच्या जेवणात नियमित भात खाल्ल्यास शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान, जाणून घ्या भात खाण्याचे दुष्परिणाम
3

रोजच्या जेवणात नियमित भात खाल्ल्यास शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान, जाणून घ्या भात खाण्याचे दुष्परिणाम

भेंडीच्या भाजीसोबत चुकूनही करू नका या पदार्थांचे सेवन, किडनीस्टोन आणि त्वचारोगाचा वाढेल गंभीर धोका
4

भेंडीच्या भाजीसोबत चुकूनही करू नका या पदार्थांचे सेवन, किडनीस्टोन आणि त्वचारोगाचा वाढेल गंभीर धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.