Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flaxseed Aloe Vera Gel: थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा दिसेल फ्रेश! अळशी-कोरफडीच्या जेलचा नियमित वापर केल्यास त्वचेला मिळेल हायड्रेशन

Flaxseed Aloe Vera Gel: थंडीच्या दिवसांमध्ये निस्तेज झालेली त्वचा पुन्हा एकदा फ्रेश आणि हायड्रेट ठेवण्यासाठी अळशीच्या बिया आणि कोरफडचा वापर करून बनवलेले जेल वापरावे. यामुळे त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कायम टिकून राहतो आणि त्वचा हायड्रेट दिसते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 21, 2026 | 09:45 AM
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा दिसेल फ्रेश! अळशी-कोरफडीच्या जेलचा नियमित वापर केल्यास त्वचेला मिळेल हायड्रेशन

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा दिसेल फ्रेश! अळशी-कोरफडीच्या जेलचा नियमित वापर केल्यास त्वचेला मिळेल हायड्रेशन

Follow Us
Follow Us:

Flaxseed Aloe Vera Gel: हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर त्वचा आणि केसांच्या समस्या वाढू लागतात. त्वचा कोरडी पडणे, सुरकुत्या येणे, बारीक रेषा दिसणे इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर महिला वेगवेगळे उपाय करतात. त्वचेला हायड्रेशन देण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर केला जातो तर काहीवेळा वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. त्वचा कोरडी, निस्तेज झाल्यानंतर कोणतेही मॉइश्चरायझर लावल्यानंतर सुद्धा त्वचा कोरडीच दिसते. थंड वारे आणि हवेतील आद्रता कमी झाल्यानंतर त्वचेतील नैसर्गिक ओलावा हळूहळू कमी होऊ जातो आणि त्वचा सुकल्यासारखी दिसते.(फोटो सौजन्य – istock)

Ayurvedic Remedies: आयुर्वेदिक उपायांनी करा डोळ्यांभोवती वाढलेला काळेपणा दूर! रात्री झोपण्याआधी लावा ‘हा’ खास घरगुती लेप

चेहरा कोरडा, निस्तेज आणि रखरखीत दिसू लागल्यानंतर त्वचा ताणल्यासारखी वाटते आणि रॅश येतात. दिवसभरात कितीही वेळा मॉइश्चरायझर लावल्यानंतर सुद्धा त्वचेमधील कोरडेपणा काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे वारंवार केमिकल युक्त स्किन केअरचा वापर करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावा. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात त्वचेला हायड्रेशन देण्यासाठी अळशी-कोरफडीचे जेल तयार करण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने जेल त्वचेवरील नैसर्गिक ओलावा कायम टिकवून ठेवण्यास मदत करते आणि त्वचा आतून हायड्रेट करते.

हिवाळ्यासाठी नैसर्गिक हायड्रेशन फेस जेल तयार करण्याची कृती:

अळशीच्या बिया
कोरफड जेल
विटामिन ई कँप्सूल
बदाम तेल

जेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम, पॅनमध्ये अळशीच्या बिया मंद आचेवर भाजा आणि त्यावर त्यात पाणी घालून शिजण्यासाठी ठेवा. बियांना मंद आचेवर एक उकळी आल्यानंतर गॅस बारीक करा आणि ५ मिनिटं शिजण्यासाठी ठेवा. त्यानंतर घट्टसर जेल झाल्यानंतर गॅस बंद करून मिश्रण गाळून घ्या. अळशीच्या बियांचे मिश्रण घट्टसर मिश्रण कोमट झाल्यानंतर कॉटनच्या कपड्यावर ओतून गाळून घ्या. तयार केलेले जेल वाटीमध्ये काढून त्यात कोरफड जेल, विटामिन ई कँप्सूल आणि बदाम किंवा खोबरेल तेल घालून जेल तयार करा.

skincare tips: चुकीच्या सवयी मुळे येतायत चेहऱ्यावर पिंपल्स,कारण व लक्षणं काय?

रात्री झोपण्याआधी चेहरा फ्रेशवॉशने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोरडा करा आणि त्यावर तयार केलेले अळशीच्या बियांचे जेल लावून हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर तसेच ठेवा. यामुळे त्वचेवर कोणतीही जळजळ किंवा लालसरपणा येत नसेल तर नियमित लावावे. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेला हायड्रेशन देण्यासाठी केवळ जेलच नाहीतर नियमित भरपूर पाणी सुद्धा आवश्यक आहे. पाण्यासोबतच आहारात पाणीदार फळांचे आणि भाज्यांचे सेवन करावे. यामुळे त्वचा आतून स्वच्छ आणि हायड्रेट राहण्यस मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अळशी आणि कोरफडीच्या जेलचा त्वचेला काय फायदा होतो?

    Ans: अळशी आणि कोरफडीच्या जेलमुळे त्वचेला ओलावा मिळण्यास मदत होते. यामुळे त्वचा मऊ, मुलायम आणि फ्रेश दिसू शकते.

  • Que: अळशी आणि कोरफडीचे जेल चेहऱ्यावर कसे बनवावे?

    Ans: अळशी पाण्यात उकळून त्यातून तयार होणारे जेल गाळून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये ताजे कोरफडीचे जेल मिसळून एकजीव करावे.

  • Que: हिवाळ्यात अळशी-कोरफडीचे जेल वापरणे फायदेशीर आहे का?

    Ans: होय. हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू शकते. अळशी-कोरफडीचे जेल त्वचेला हायड्रेशन देण्यास मदत करू शकते.

Web Title: Flaxseed aloe vera gel regular use of a flaxseed and aloe vera gel will provide hydration to your skin sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips
  • Winter Care

संबंधित बातम्या

टॅनिंग- डलनेस होईल कायमचा दूर! ‘या’ भाज्यांचा वापर करून घरीच तयार करा फेसपॅक, त्वचेवर येईल पार्लरसारखा ग्लो
1

टॅनिंग- डलनेस होईल कायमचा दूर! ‘या’ भाज्यांचा वापर करून घरीच तयार करा फेसपॅक, त्वचेवर येईल पार्लरसारखा ग्लो

Ayurvedic Remedies: आयुर्वेदिक उपायांनी करा डोळ्यांभोवती वाढलेला काळेपणा दूर! रात्री झोपण्याआधी लावा ‘हा’ खास घरगुती लेप
2

Ayurvedic Remedies: आयुर्वेदिक उपायांनी करा डोळ्यांभोवती वाढलेला काळेपणा दूर! रात्री झोपण्याआधी लावा ‘हा’ खास घरगुती लेप

skincare tips: चुकीच्या सवयी मुळे येतायत चेहऱ्यावर पिंपल्स,कारण व लक्षणं काय?
3

skincare tips: चुकीच्या सवयी मुळे येतायत चेहऱ्यावर पिंपल्स,कारण व लक्षणं काय?

Collagen Night Gel: चेहऱ्यावर वाढलेल्या डेड स्किनमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग निळ्या फुलांचा वापर करून बनवा होममेड फेस क्रीम
4

Collagen Night Gel: चेहऱ्यावर वाढलेल्या डेड स्किनमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग निळ्या फुलांचा वापर करून बनवा होममेड फेस क्रीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.