
चव इतकी भन्नाट की सगळेच करतील कौतुक! पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत मखाना बाईट्स
Food Recipe: पाहुणे घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी नेहमीच काय बनवावं, असा प्रश्न सगळ्यांच कायम पडतो. चिवडा, शेव, भजी इत्यादी ठरावीक पदार्थ कायमच बनवले जातात. पण तेच ठरावीक पदार्थ बनवण्याऐवजी झटपट मखाना कुरकुरीत बाईट्स बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी साहित्यात बनवलेल्या पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहे. मखानामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, लोह, जस्त इत्यादी घटक मोठ्या प्रमणावर आढळून येतात. तसेच यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रथिने इत्यादी घटक असतात. सांधेदुखी, अंगदुखी किंवा कंबर दुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर आहारात मखानाचे सेवन करावे. यामुळे पोटसुद्धा भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. शरीरात वाढलेली रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात मखानाचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया कुरकुरीत मखाना बाईट्स बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)