
Antibiotic: अँटिबायोटिक्स गोळी खाल्यानंतर पचनक्रिया का बदलते? शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
Antibiotic: धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढता तणाव, आहारात होणारे बदल, मानसिक तणाव, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. कधी कधी खोकला, सर्दी किंवा कोणताही संसर्ग झाल्यानंतर लगेच मेडीकल गोळ्या आणून खालल्या जातात. पण वांरवांर मेडीकलमधील गोळ्या औंषधांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानि पोहचण्याची शक्यता असते. डाॅक्टारांच्या सलल्याने न घेतलेल्या अँटिबायोटिक्स गोळ्या थेट पचनक्रियेवर परिणाम करतात. त्यामुळे अँटिबायोटिक्स घेताना डाॅक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे. गट हेल्थ परिणाम झाल्यानंतर औषधांचा प्रभाव वाढल्यास गंभीर आजारांची शरीराला लागण होऊ शकते. अँटिबायोटिक्स गोळ्या बॅक्टेरियापुरता मर्यादित न राहता शरीरातील प्रत्येक अवयवावर परिणाम करतात. चला तर जाणून घेऊया अँटिबायोटिक्स गोळी खाल्यानंतर पचनक्रिया का बदलते? याबद्द्ल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
अँटिबायोटिक्स गोळ्या घेतल्यानंतर तात्पुरता परिणाम शरीरावर दिसून येतो आणि पुन्हा एकदा आरोग्य बिघाडण्याची शक्यता असते. या गोळ्या आतड्यांमध्ये असणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन बिघडतात. पचनसंस्था बिघडू लागल्यानंतर हळूहळू खालेले अन्नपदार्थ पचन होताना अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. पचनसंस्था बिघडण्याचा धोका वाढू लागल्यानंतर दुर्लक्ष करणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे वांरवांर अँटिबायोटिक्सच्या गोळ्या खाऊ नये.
अँटिबायोटिक्स गोळ्या खाल्यानंतर पचनक्रियेवर परिणाम होतो. ज्यावेळी आतड्यांमधील सूक्ष्मजीव अँटिबायोटिक्सवर प्रतिक्रिया करतात, तेव्हा उपचारावेळी पचनाशी संबंधित उद्भवतात आणि आरोग्य बिघाडून टाकतात. त्यामुळे कोणत्याही गोळ्यांचे सेवन करताना शरीराला कोणतीही हानि पोहचणार नाही याची खात्री करूनच गोळ्या खाव्यात.
अँटिबायोटिक घेतल्यावर शौचास जाण्याच्या सवयींमध्ये अचानक बदल होण्याची शक्यता असते. अँटिबायोटिक्समुळे आतड्यांच्या कार्यावर वाईट परिणाम होतो आणि मायक्रोबियल ग्रुपचे संतुलन बिघडते, ज्याच्या परिणामांमुळे सतत जुलाब होऊन आरोग्य बिघाडून जाते. अन्नाचे पचन आणि फर्मेंटेशन प्रक्रियेमध्ये आतड्यांमधील बॅक्टेरिया महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे अँटिबायोटिक्स घेतल्यानंतर काहींना लगेच पोट फुगणे किंवा गॅस होण्याचा त्रास होऊ शकतो.
अँटिबायोटिक्स पचनाशी संबंधित मायक्रोबियल प्रक्रियेवर परिणाम करतात. आतड्यांच्या हालचालींवर परिणाम झाल्यामुळे वारंवार शौचास जावे लागणे किंवा बद्धकोष्ठता जाणवू लागते. मायक्रोबायोममधील कोणत्याही बदलामुळे फर्मेंटेशन आणि मायक्रोबियल चयापचय प्रक्रियेवर होतो. यामुळे पोटात कळा मारणे किंवा पोटात अस्वस्थता वाटू लागते. डाॅक्टरांच्या सल्ल्याने घेतलेल्या अँटिबायोटिकचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर सुद्दा पोटाच्या समस्या जाणवत असतील तर दुर्लक्ष न करता डाॅक्टरांचा .योग्य सल्ला घ्यावा.
Ans: अँटिबायोटिक्स संसर्ग निर्माण करणाऱ्या जीवाणूंवर काम करतात. मात्र, काही अँटिबायोटिक्सचा परिणाम आतड्यांमधील उपयुक्त जीवाणूंवरही होऊ शकतो.
Ans: काही व्यक्तींना जुलाब, मळमळ, पोटदुखी, पोट फुगणे किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. ही लक्षणे औषधाच्या प्रकारानुसार आणि व्यक्तीच्या प्रकृतीनुसार वेगवेगळी असू शकतात.
Ans: अँटिबायोटिक्समुळे आतड्यांतील जीवाणूंचे संतुलन बदलू शकते. त्यामुळे काही रुग्णांना जुलाब होतात.