Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi Recipe: बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा बुंदीचा चविष्ट मोदक

गणोशोत्सव सणानिमित्त आज आम्ही तुम्हाला बुंदीचे मोदक कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी फार कमी साहित्यापासून आणि कमी वेळेत बनून तयार होते. तुम्हालाही बाप्पासाठी काही हटके पण त्याच्या आवडीचे बनवायचे असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 06, 2024 | 11:33 AM
Ganesh Chaturthi Recipe: बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा बुंदीचा चविष्ट मोदक

Ganesh Chaturthi Recipe: बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा बुंदीचा चविष्ट मोदक

Follow Us
Follow Us:

आता लवकरच आपल्या मायानगरीत गणेशाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव हा सण हिंदू धर्मातील एक पवित्र सणांपैकी एक आहे. आता बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झाली असून अनेकांना बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागून राहिली आहे. आता बाप्पा म्हटलं की त्यांचे आवडते मोदक हे आलेच. मोदक हा बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ आहे त्यामुळेच बाप्पाच्या प्रसादासाठी आणि नैवेद्यासाठी नेहमी मोदक तयार केले जातात.

आता बदलत्या काळानुसार मोदकांचे अनेक प्रकार बाजारात आलेत. जसे की, चॉकलेट मोदक, मलाई मोदक. तुम्हाला बुंदीचे लाडू खायला आवडत असतील तर आजची ही रेसिपी तुम्ही गणेश चतुर्थीला तयार करू शकता. आज आपण बुंदीपासून चविष्ट लाडू कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. ही रेसिपी चविष्ट आणि फार सोपी आहे. फार कमी वेळेत तुमचे हे चविष्ट मोदक बनून तयार होतील. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा –  हरतालिकेच्या पूजेवेळी नैवेद्यासाठी बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करा पारंपरिक रेसिपी

साहित्य

  • 2 वाटी बेसन पीठ
  • 3 वाटी साखर
  • 1 वाटी ड्राय फ्रुट्स
  • तेल आवश्यतकतेनुसार
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवनिमित्त घरी बनवा केसर माव्याचे चविष्ट मोदक, वाचा पारंपरिक रेसिपी

कृती

  • बुंदीचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम बेसन पीठ घ्या आणि यात पाणी टाका
  • आता बेसन आणि पाण्याचे एक मिश्रण तयार करून घ्या
  • यानंतर झऱ्याच्या साहाय्याने याची बुंदी गरम तेलात पाडून छान कुरकुरीत तळून घ्या
  • बुंदी तळून झाली की एका भांड्यात काढून ठेवा
  • आता दुसरीकडे एक भांडे गॅसवर ठेवून यात पाणी आणि साखर घाला आणि एक चांगला पाक तयार करा
  • याला सतत ढवळत रहा आणि याचा एक परफेक्ट पाक तयार करा
  • आता पाक बरोबर आहे की नाही यासाठी चमच्याने पाक बोटावर घ्या आणि बोटांच्या मदतीने दाबून याची तार ओढली जाते का ते चेक करा
  • तार आली की समजा तुमचा पाक बरोबर तयार आहे
  • यानंतर आता तयार पाकामध्ये बुंदी टाका आणि ढवळून नीट मिक्स करा
  • आता मिश्रणात ड्रायफ्रुट्स टाकून मिक्स करा आणि गॅस बंद करा
  • यानंतर तयार मिश्रणाचे साच्याच्या मदतीने मोदक तयार करून घ्या

Web Title: Ganesh chaturthi make delicious bundi modak for ganpati bappas prasad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 11:33 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi: गणपतीच्या १२ नावांमागे दडलाय खास अर्थ; प्रत्येक नावाचा अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या
1

Ganesh Chaturthi: गणपतीच्या १२ नावांमागे दडलाय खास अर्थ; प्रत्येक नावाचा अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत

Ganesh Chaturthi: दीड ते दहा दिवसांचा गणपती; प्रत्येक दिवसामागे काय आहे महत्त्व? जाणून घ्या
3

Ganesh Chaturthi: दीड ते दहा दिवसांचा गणपती; प्रत्येक दिवसामागे काय आहे महत्त्व? जाणून घ्या

Legal Notice To Vidyanand Bapat: ४८ तासांत बिनशर्त माफी मागा…; विद्यानंद बापटांना कोणी पाठवली कायदेशीर नोटीस?
4

Legal Notice To Vidyanand Bapat: ४८ तासांत बिनशर्त माफी मागा…; विद्यानंद बापटांना कोणी पाठवली कायदेशीर नोटीस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.