Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चमचमीत खायची इच्छा होतेय? मग रात्रीच्या जेवणाला बनवा मसालेदार दही छोले; पाहूनच तोंडाला पाणी सुटेल

Dahi Chole Recipe: छोले भाजी तर तुम्ही खाल्लीच असेल मात्र कधी दही छोले ट्राय केले आहेत का? ही चविष्ट रेसिपी फार झटपट तयार होते आणि चवीलाही फार अप्रतिम लागते. नोट करा याची सोपी रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 09, 2025 | 09:25 AM
चमचमीत खायची इच्छा होतेय? मग रात्रीच्या जेवणाला बनवा मसालेदार दही छोले; पाहूनच तोंडाला पाणी सुटेल

चमचमीत खायची इच्छा होतेय? मग रात्रीच्या जेवणाला बनवा मसालेदार दही छोले; पाहूनच तोंडाला पाणी सुटेल

Follow Us
Follow Us:

दररोज काय जेवण बनवायचं… हा गृहिणींना पडणारा रोजचा प्रश्न आहे. आजकाल तर गृहिणी काम आणि घर दोन्ही सांभाळतात. अशात महिला वर्ग नेहमीच काहीतरी चविष्ट पण झटपट तयार होणाऱ्या रेसिपीजच्या शोधात असतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक अशीच रेसिपी घेऊन आलो आहोत जी चवीला तर अप्रतिम लागतेच शिवाय कमी वेळातच बनून तयार होते. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे दही छोले.

छोलेची मसालेदार भाजी ते तुम्ही अनेकदा खाल्ली असेल तर मात्र तुम्ही कधी दही छोले खाल्ले आहेत का? नसेल तर आता ही रेसिपी ट्राय करून पहा. छोलेच्या भाजीत दही टाकताच त्याची चव वाढते आणि क्रिमी मसालेदार चव चाखता येते. रात्रीच्या जेवणासाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे. तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी नवीन खायचे असेल तर एकदा ही रेसिपी बनवून पाहाच. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Soya Pulao Recipe: रात्रीच्या जेवणासाठी घरी बनवा गरमा गरम सोया पुलाव; नोट करा सोपी रेसिपी

साहित्य

  • 1 कप छोले
  • 3-4 टेबलस्पून दही
  • 7-8 काजू
  • 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • 1 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून लाल मिरची पावडर
  • 1 टीस्पून धणे पावडर
  • 1 टीस्पून जिरे पावडर
  • मीठ, चवीनुसार
  • 2 टेबलस्पून तेल
  • 1 टीस्पून जिरे
  • 1 टीस्पून कसुरी मेथी
  • चिरलेला कांदा
  • ताजी धणे
  • चिरलेला टोमॅटो
  • गरम मसाला

Raw Banana Chutney: कच्च्या केळीपासून बनवा चविष्ट अन् पौष्टिक चटणी; चव अशी बोटं चाटत रहाल 

कृती

  • दही छोले बनवण्यासाठी सर्वप्रथम छोले 7-8 तास पाण्यात भिजत ठेवा
  • यानंतर छोले कुकरमध्ये टाका, यात आवश्यकतेनुसार पाणी टाका आणि 3-4 शिट्ट्या घ्या
  • आता मिक्सरच्या भांड्यात दही, काजू, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, हळद, लाल तिखट, धणे पावडर आणि
  • जिरे पावडर एकत्र करा आणि पेस्ट बनवा
  • आता गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल गरम झाले की मग यात जिरे आणि कसुरी मेथी घाला आणि परता
  • आता यात चिरलेला टोमॅटोची घाला आणि काहीवेळ शिजवा
  • यानंतर यात यात दह्याची पेस्ट घाला आणि काही मिनिटे परतून घ्या
  • मग यात उकडलेले छोले घाला आणि साहित्यात छान मिक्स करा
  • शेवटी यात मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घाला, झाकण ठेवून भाजी काही मिनिटे शिजवून घ्या आणि मग गॅस बंद करा
  • तयार दही छोले भात अथवा चापतीसह खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make tasty dahi chole subji at home for dinner recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 09:25 AM

Topics:  

  • dinner recipe
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
1

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
2

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
3

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
4

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.