
साखर माव्याचा अजिबात वापर न करता झटपट बनवा हेल्दी टेस्टी खजूर बर्फी
रक्तातील साखर वाढेल या भीतीने अनेक लोक गोड पदार्थांचे सेवन करणे टाळतात. गोड पदार्थांचे अजिबात सेवन केले जात नाही. पण आहारात गोड पदार्थ न खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी पूर्णपणे खालवण्याची शक्यता असते. यामुळे वारंवार तुम्हाला अशक्तपणा किंवा थकवा जाणवून चक्कर येण्याची भीती असते. त्यामुळे आहारात साखर युक्त गोड पदार्थांचे सेवन करावे. गूळ किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. जेवणानंतर अनेकांना काहींना काही गोड पदार्थ खाण्याची सवय असते. अशावेळी चॉकलेट किंवा गूळ खाल्लेले जाते. म्हणूनच आज आम्ही साखर माव्याचा वापर न करता खजूर बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. खजूर शरीरासाठी चांगले असतात. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक किंवा दोन खजूर खाल्ल्यास मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळेल. याशिवाय हाडांच्या वेदना कमी होतात. खजूर खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते. चला तर जाणून घेऊया खजूर बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
पंजाबचा पारंपारिक पदार्थ; थंडीत नक्की बनवून पहा गरमा गरम ‘माँ की दाल’, मनाला तृप्त करणारी चव