Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोंडाला पाणी आणणारी दही पापडी चाट घरी कशी बनवायची? आजच नोट करा हलवाईवाली रेसिपी

Dahi Papdi Chaat Recipe : थंडगार, कुरकुरीत आणि चटपटीत चवीची दही पापडी चाट संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. मुख्य म्हणजे फार झटपट आणि निवडक साहित्यापासून याला घरीच तयार करता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 04, 2026 | 03:30 PM
तोंडाला पाणी आणणारी दही पापडी चाट घरी कशी बनवायची? आजच नोट करा हलवाईवाली रेसिपी

तोंडाला पाणी आणणारी दही पापडी चाट घरी कशी बनवायची? आजच नोट करा हलवाईवाली रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • भारताच्या प्रत्येक स्ट्रीटवर मिळणारा दही पापडी चाट सर्वांच्या आवडीचा आहे.
  • थंडगार दही आणि कुरकुरीत पापडी यांची चव फार अप्रतिम लागते.
  • संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा पदार्थ घरीच तयार करू शकता.
भारतीय स्ट्रीट फूड संस्कृतीत चाटला एक वेगळंच स्थान आहे आणि त्यातही दही पापडी चाट म्हणजे चवींचा परिपूर्ण संगम. कुरकुरीत पापडी, गारसर दही, गोड-तिखट चटण्या आणि सुगंधी मसाल्यांचा मिलाफ म्हणजे दही पापडी चाट. उत्तर भारतातील गल्ल्यांपासून ते मोठ्या शहरांतील फूड स्टॉल्सपर्यंत ही चाट सगळीकडे आवडीने खाल्ली जाते.

पंजाबचा पारंपारिक पदार्थ; थंडीत नक्की बनवून पहा गरमा गरम ‘माँ की दाल’, मनाला तृप्त करणारी चव

दही पापडी चाटची खासियत म्हणजे तिची संतुलित चव. दह्याचा थंडावा, चिंचेच्या गोड-आंबट चटणीची गोडी, हिरव्या चटणीची झणझणीत चव आणि पापडीचा कुरकुरीतपणा हे सगळं एकत्र आलं की तोंडात पाणी आणणारा अनुभव मिळतो. उन्हाळ्यात थंडावा देणारी आणि सण-समारंभ, वाढदिवस किंवा खास पाहुण्यांसाठी झटपट बनवता येणारी ही चाट प्रत्येक वयोगटाला आवडते. घरच्या घरी दही पापडी चाट बनवताना आपण साहित्य आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकतो. स्वच्छता, ताजं दही आणि कुरकुरीत पापडी वापरली तर स्ट्रीट फूडसारखीच चव घरच्या घरी मिळू शकते. चला तर मग, सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक चवीत दही पापडी चाट कशी तयार करायची याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • पापडी – 12 ते 15
  • दही – 1 कप (घट्ट व फेटलेले)
  • उकडलेले बटाटे (चिरलेले) – 1 मध्यम
  • उकडलेले काबुली चणे – ½ कप
  • हिरवी चटणी (कोथिंबीर-पुदिन्याची) – 2 टेबलस्पून
  • चिंचेची गोड चटणी – 2 टेबलस्पून
  • लाल तिखट – ½ टीस्पून
  • भाजलेले जिरे पूड – ½ टीस्पून
  • चाट मसाला – 1 टीस्पून
  • शेव – सजावटीसाठी
  • डाळिंब दाणे
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – सजावटीसाठी
पांढरा भात खाऊन कंटाळा आला आहे? मग संध्याकाळच्या जेवणात काही मिनिटांमध्ये बनवा लेमन राईस, नोट करा रेसिपी

कृती:

  • सर्वप्रथम सर्व्हिंग प्लेटमध्ये पापड्या एक एक करून ठेवा.
  • प्रत्येक पापडीवर थोडे उकडलेले बटाटे आणि काबुली चणे ठेवा.
  • त्यावर फेटलेले दही सम प्रमाणात घाला.
  • आता हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी घाला.
  • त्यावर लाल तिखट, भाजलेले जिरे पूड आणि चाट मसाला भुरभुरा.
  • शेव आणि डाळिंब दाण्यांनी सजवा.
  • लगेच सर्व्ह करा, म्हणजे पापडी कुरकुरीत राहतील.
  • दही आंबट नसावं; गरज असल्यास थोडी साखर घालू शकता.
  • अधिक चवीसाठी थोडं फेटलेलं दही थंडगार करून वापरा.

Web Title: How to make street style dahi papdi chaat at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!
1

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी
2

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने
3

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव
4

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.