
महिलांसाठी खास! गोव्यात तयार करण्यात आलेत स्विम झोन; फुल प्रायव्हसीसह आता एकट्याने घेता येईल समुद्रकिनाऱ्याचा आनंद
उन्हाळा ऋतू सुरु झाला आहे, या ऋतूत अनेकांचे फिरण्याचे प्लॅन बनतात. हा काळ फिरण्यासाठीचा एक उत्तम काळ मानला जातो. उन्हळ्यात मुलांना शाळेचा सुट्टी असते शिवाय वातावरण देखील उष्णतेने भरलेले अशात अनेक कुटुंबीय आपल्या रोजच्या जीवनातून थोडा ब्रेक घेऊन याकाळात फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. भारतात फिरण्यासाठीची अनेक ठिकाणे आहेत आणि यातीलच एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजे गोवा! गोव्याच्या समुद्रकिनारी सुट्टीचा एक अविस्मरणीय अनुभव घेता येतो. या ठिकाणाचा आनंद लुटण्यासाठी परदेशी पर्यटक देखील इथे भेट देत असतात. सध्या सोलो ट्रॅव्हलिंगचा ट्रेंड फार वाढला आहे, यात व्यक्ती एकट्याने फिरायला जातो.
भारतातील या ठिकाणी घेता येईल Skydiving चा आनंद; असे साहस जे आयुष्यभर स्मरणात राहील…
तथापि, जर कोणी कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असेल तर तो प्रथम सुरक्षिततेकडे लक्ष देतो. अलिकडच्या काळात समुद्रकिनाऱ्यावर मुलींची छेड काढणे, त्यांना टक लावून पाहणे किंवा गुप्तपणे व्हिडिओ बनवण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या संदर्भात, गोव्यातील प्रशासन आणि जीवरक्षक एजन्सी दृष्टी मरीनने एक नवीन आणि प्रशंसनीय उपक्रम सुरू केला. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर मुलींच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. गोवा प्रशासन आणि जीवरक्षक एजन्सी दृष्टी मरीन यांनी संयुक्तपणे काही समुद्रकिनाऱ्यांवर महिलांसाठी विशेष स्विम झोन तयार केले आहेत. या झोनमध्ये फक्त महिलाच समुद्रात आंघोळ करू शकतात किंवा समुद्रकिनाऱ्यांवर आराम करू शकतात. या झोनमध्ये पुरुषांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. यामुळे, महिला आता कोणत्याही भीतीशिवाय समुद्रकिनाऱ्याचा मनसोक्त आनंद लुटू शकतात.
सोप्या शब्दांत सांगायचे तर, इथे तीन झोन तयार केले आहेत. एक महिलांसाठी, दुसरा पुरुषांसाठी तर तिसरा झोन कुटुंबांसाठी असे तीन झोन आहेत. गोवा आता प्रशासन सर्वांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अनेक वेळा महिलांना समुद्रकिनाऱ्यावर टक लावून पाहणे, फॉलो करणे किंवा व्हिडिओ बनवणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. अशा परिस्थितीत, हे झोन महिलांना प्रायव्हसी, सिक्योरिटी आणि आराम प्रदान करण्यासाठी काम करत आहेत.
या समुद्रकिनाऱ्यांवर बनवण्यात आलेत स्विम झोन
ही सुविधा भारतात पहिल्यांदाच सुरू करण्यात आली आहे. महिलांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून जीवरक्षकांची टीम देखील या झोनमध्ये सतर्क राहते. Drishti Marine च्या मते, आतापर्यंत ४० हून अधिक ‘महिला विशेष झोन’ तयार करण्यात आले आहेत. येत्या काळात त्यांची संख्या १०० पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
सोलो ट्रॅव्हलर्ससाठी बेस्ट ऑप्शन
जर कोणतीही मुलगी किंवा महिला एकट्याने किंवा मित्रांसोबत प्रवास करण्याचा विचार करत असेल तर ही ठिकाणे त्यांच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरले. इथे महिला मोकळेपणाने समुद्रकिनाऱ्याचा आनंद लुटू शकतात आणि आनंद लुटू शकतात. इथे तुम्ही फोटो काढू शकता आणि कोणत्याही काळजीशिवाय मजा करू शकता.
विमानाने
तुम्ही इथे विमानाने जाण्याचा विचार करत असाल तर दाबोलीम विमानतळ हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जे पणजीपासून सुमारे २६ किमी अंतरावर आहे. हा एक उत्तम पर्याय असू शकतो. येथून तुम्ही कॅब किंवा टॅक्सी करू शकता.
रस्त्याने
जर तुम्हाला रोड ट्रिपची आवड असेल तर हा देखील एक उत्तम पर्याय असू शकतो. रस्त्याने प्रवास करताना तुम्हाला अनेक विहंगम दृश्यांचा आनंद लुटता येईल.
रेल्वेने
तुम्ही रेल्वेनेही गोव्याला जाऊ शकता, इथे जाण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. येथे दोन रेल्वे स्थानके आहेत. पहिले वास्को द गामा तर दुसरे मडगाव रेल्वे स्टेशन.