(फोटो सौजन्य: istock)
मागील काही काळापासून स्कायडायव्हिंगचा ट्रेंड लोकांमध्ये झपाट्याने वाढत चालला आहे. आपल्या आयुष्यात काही नवीन आणि साहसी करून पाहायच्या प्रयत्नात लोक रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि स्कूबा डायव्हिंग अशा अनेक ऍक्टिव्हिटीजचा अनुभव घेतात. असाच एक साहसी खेळ म्हणजे स्कायडायव्हिंग! हा एक साहसी ऍक्टिव्हिटी आहे ज्यात लोक हार्नेसच्या मदतीने हवेत झेप घेतात.
याच्या नावातच याचा मूळ अर्थ दडलेला आहे, स्काय म्हणजे अवकाश आणि डायव्हिंग म्हणजे झेप… ही अवकाशाची झेप तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. तुमच्यात साहस भरलेले असेल आणि नवीन गोष्टींची मजा घेण्याची आवड असेल तर स्कायडायव्हिंग तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. भारतात अनेक ठिकाणी स्कायडायव्हिंगचा आनंद लुटता येतो. चला या ठिकाणांची यादी जाणून घेऊया.
मैसूर स्कायडायव्हिंग
जेव्हा स्कायडायव्हिंगसाठी दक्षिण भारतातील एखाद्या उत्तम आणि प्रसिद्ध ठिकाणाचा विचार केला जातो तेव्हा बरेच लोक प्रथम म्हैसूरचे प्रथम घेतले जाते. म्हैसूर हे कर्नाटकातील एक सुंदर ठिकाण आहे जिथे दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. इथे तुम्हाला स्कायडायव्हिंगचा अद्भुत अनुभव अनुभवता येईल. म्हैसूरमध्ये प्रथम स्कायडायव्हिंगचे प्रशिक्षण दिले जाते आणि ट्रेकिंगनंतर सुमारे १० हजार फूट उंचीवरून उडी मारली जाते. स्कायडायव्हिंग करताना, म्हैसूर शहराच्या आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्य अनुभवता येते. येथील आकाशात उडण्याचे रोमांचक क्षण तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाहीत.
पुद्दुचेरी स्कायडायव्हिंग
पुद्दुचेरी हे देशातील आणखीन एक फिरण्यासाठीचे एक लोकप्रिय ठिकाण आहे. इथे दररोज हजारोंहून अधिक पर्यटक भेट येतात. पुद्दुचेरी हे देशातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे, या ठिकाणचे सौंदर्य इतके सुंदर आहे की ते पाहण्यासाठी परदेशातून लोक इथे येत असतात. पुद्दुचेरी हे त्याच्या सुंदर समुद्री लाटांसह स्कायडायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे स्कायडायव्हिंगसाठी आणि समुद्रावरून उड्डाण करण्यासाठी येतात. येथे तुम्हाला १० हजार फूट उंचीवरून उडी मारताना अनेक अद्भुत दृश्ये पाहायला मिळतील.
हैदराबाद स्कायडायव्हिंग
दक्षिण भारतीय तेलंगणा राज्याची राजधानी असलेले हैदराबाद केवळ बिर्याणीसाठीच नाही तर इतर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. हैदराबाद संपूर्ण भारतात स्कायडायव्हिंगसाठीचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे तुम्ही नागार्जुन सागर विमानतळावर स्कायडायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. टँडम जंपिंगसाठी हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. हैदराबादमध्ये, सुमारे १०-१२ हजार फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग जंप केले जाते. सागर विमानतळाजवळ पर्यटकांना आधी स्कायडायव्हिंगचे प्रशिक्षण देखील दिले जाते.
अॅम्बी व्हॅली स्कायडायव्हिंग
जर तुम्ही महाराष्ट्रात स्कायडायव्हिंगसाठी सर्वोत्तम ठिकाण शोधत असाल तर, तर तुम्ही आंबी व्हॅलीला भेट देऊ शकता. हे ठिकाण संपूर्ण भारतात टँडम जंपसाठी प्रसिद्ध आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक स्कायडायव्हिंगसाठी आंबी व्हॅलीमध्ये येतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, येथे स्कायडायव्हिंगच्या अर्धा तास आधी एक ब्रीफिंग सत्र आयोजित केले जाते. त्यानंतर स्कायडायव्हिंगची मजा लुटली जाते. आंबी व्हॅलीमध्ये सुमारे १० हजार फूट उंचीवरून उडी मारताना, तुम्ही तुमच्या डोळ्यांत आश्चर्यकारक आणि नेत्रदीपक दृश्ये टिपू शकता आणि तुमच्या मनात ते साठवूनही ठेवू शकता. स्कायडायव्हिंगचा अनुभव तुमच्या स्मरणात राहण्यासारखा आहे जो आयुष्यात एकदा तरी अनुभवायला हवा.