Social कडून Mumbai Local Heroes मेन्यू लाँच, पदार्थ असे जे तुम्ही कधी पाहिलेच नसेल !
मुंबई म्हटलं की अनेकाना गेट वे ऑफ इंडिया किंवा मरीन लाईन्स आठवते. याही पलीकडे मुंबई अजून एक गोष्टीसाठी लोकप्रिय आहे. आणि ती गोष्ट म्हणजे मुंबईची खाद्यसंस्कृती. मुंबई म्हणजे वडापाव असे आपण सर्वच म्हणतो. पण वडापाव पलीकडेही मुंबईत अनेक असे पदार्थ आहेत, जे खऱ्या मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत भर घालत आहे. याच खाद्यसंस्कृतीला एक वेगळा टच देत मुंबईतील Social या रेस्टॉरंटने Mumbai Local Heroes मेन्यू लाँच केला आहे. यानिमित्ताने मुंबईकरांना लोकल डिशेस एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.
मुंबई सोशलने महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये विविध फ्युजन समाविष्ट केले आहेत. या लोकल हिरो मेन्यू मध्ये ठेचा सोबतचा समोसा भाकरवडी हा एक आगळावेगळा पदार्थ पाहायला मिळतो. तसेच कोकणातील कोंबडी वडे मध्ये सावजी स्टाइल मटणचे कॉम्बिनेशन समाविष्ट केले गेले आहे. याव्यतिरिक्त या मेन्यूमध्ये काही उत्तम आणि अस्सल पदार्थ जसे की कोथिंबीर वडी, भुजिंग, प्रॉन्स कोळीवाडा सारखे पदार्थ पाहायला मिळतात.
हा नवीन मेन्यू कुलाबा, खार, पॅलेडियम, कार्टर रोड, वाशी, विक्रोळी, वर्सोवा, मालाड, चेंबूर, घाटकोपर, न्यू कफ परेड, कॅपिटल (बीकेसी), गोरेगाव, दादर, नेस्को, पवई आणि ठाणे यासह मुंबईतील सर्व 17 सोशल आऊटलेट्सवर उपलब्ध असेल.
Chef Glyston यांना मुंबई लोकल हिरो मेन्यूची कलपना सुचली. आता याच मेन्यूचा 3.0 व्हर्जन लाँच झाला आहे. याच निमित्ताने, त्यांच्यासोबत काही खास बातचीत झाली. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
मुंबईत असे अनेक लोकल पदार्थ आहे, जे आता खूप कमी प्रमाणात आणि त्या त्या ठिकाणी खाल्ले जातात. त्यामुळेच आम्हाला याच लोकल पदार्थांना कुठेतरी लोकांसमोर आणायचे होते. म्हणूनच आम्ही Local Heroes Menu लाँच केला आहे.
या प्रश्नाचे उत्तर देताना Chef Glyston म्हणतात,” हा लोकल हिरो मेन्यू संपूर्ण मुंबई शहरातील सोशल ओउटलेट्सवर उपलब्ध असेल. त्यामुळे लोकांना मुंबईतील अस्सल पदार्थांचा आस्वाद एका वेगळ्या पद्धतीने घेता येणार आहे.”
हा लोकल हिरो मेन्यू चा 3.0 भाग आहे, त्यामुळेच हा मेन्यू चालूच राहणार आहे. फक्त यातील डिशेस बदलले जातील. म्हणजेच हा मेन्यू बंद न होता नेहमी अपग्रेड होत राहील.
आपले लोकल पदार्थ हे आपले हिरो आहे. म्हणजेच जेव्हा मी बाहेरच्या देशात जातो तेव्हा मला पिझ्झा पाहायला मिळतो, बर्गर पाहायला मिळतो. पण जेव्हा आपण आपल्याच देशातील रेस्टारंटमध्ये जातो तेव्हा आपल्याला आपलेच लोकल पदार्थ खाण्यास मिळत नाही. म्हणूनच आम्ही या लोकल पदार्थांना लोकल हिरो मानतो.
Chef Glyston पुढे म्हणतात की येत्या Local Heroes Menu 4.0 मध्ये आम्ही कोल्हापूरच्या पांढरा रस्साचे कॉम्बिनेशन कोरियन रामेन सोबत करणार आहोत. याबाबत आमचे प्रयत्न चालू आहे.
Chef Glyston चे सहकारी समीर पाटील हे विरारचे रहिवाशी आहेत. आणि विरार म्हंटलं की अनेकांना तेथील भुजिंग हा खास पदार्थ आढळतो. हा पदार्थ आता सोशलमध्ये पाहता येणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने विरारचा भुजींग आता मुंबईतील लोकांना अनुभवता येणार आहे.