Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोर्टिस हॉस्पिटल कल्‍याणकडून कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेसोबत ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी जागरूकता सत्राचे आयोजन

फोर्टिस हॉस्पिटल कल्‍याणमधील डॉक्‍टरांनी सविस्‍तरपणे चर्चा करत सामान्‍य न्‍यूरोलॉजिकल, कार्डियोव्‍हॅस्‍कुलर व ऑर्थोपेडिक आजारांबाबत माहिती देण्‍यासोबत जनजागृती केली. या सत्रामध्‍ये उपस्थित व्‍यक्‍ती आरोग्‍यसेवा व्‍यावसायिकांना भेटल्‍या, त्‍यांना शंका विचारल्‍या, प्रतिबंधात्‍मक उपाय आणि उपलब्‍ध उपचारांबाबत माहिती मिळवली.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 07, 2024 | 01:25 PM
ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी जागरूकता सत्राचे आयोजन

ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी जागरूकता सत्राचे आयोजन

Follow Us
Follow Us:

कल्‍याण, ऑक्‍टोबर 2024 : फोर्टिस हॉस्पिटल कल्‍याणने कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) आणि समन्‍वय सीनियर सिटीझन्‍स असोसिएशनसोबत सहयोगाने 4 ऑक्‍टोबर रोजी आचार्य प्रल्‍हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्‍याण येथे ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी जागरूकता सत्राचे आयोजन केले. फोर्टिस हॉस्पिटल कल्‍याणमधील डॉक्‍टरांनी सविस्‍तरपणे चर्चा करत सामान्‍य न्‍यूरोलॉजिकल, कार्डियोव्‍हॅस्‍कुलर व ऑर्थोपेडिक आजारांबाबत माहिती देण्‍यासोबत जनजागृती केली. या सत्रामध्‍ये उपस्थित व्‍यक्‍ती आरोग्‍यसेवा व्‍यावसायिकांना भेटल्‍या, त्‍यांना शंका विचारल्‍या, प्रतिबंधात्‍मक उपाय आणि उपलब्‍ध उपचारांबाबत माहिती मिळवली.

फोर्टिस हॉस्पिटल कल्‍याण येथील डॉ. झाकिया खान (सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट- इंटरव्‍हेंशनल कार्डियोलॉजी), डॉ. स्‍वप्‍नील केणी (कन्‍सल्‍टण्‍ट- ऑर्थोपेडिक्‍स), डॉ. जयेश सरधारा (सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट- न्‍यूरो अँड स्‍पाइन सर्जरी) आणि डॉ. ऋषभ छेडा (असोसिएट कन्‍सल्‍टण्‍ट – न्‍यूरो सर्जरी) यांनी या सत्राचे नेतृत्‍व केले. तसेच, कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेच्‍या (केडीएमसी) आयुक्‍त माननीय डॉ. इंदुराणी जाखड यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

हे देखील वाचा: मसाल्याचे पाणी शरीराला करते डिटॉक्स, जाणून घ्या जबरदस्त फायदे

ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी जागरूकता सत्राचे आयोजन

या सत्राबाबत मत व्‍यक्‍त करत डॉ. इंदुराणी जाखड म्‍हणाल्‍या, ”आम्‍ही ज्‍येष्‍ठ नागरिकांना त्‍यांचे न्‍यूरोलॉजिकल, कार्डियोव्‍हॅस्‍कुलर व ऑर्थोपेडिक आरोग्‍याच्‍या महत्त्वपूर्ण पैलूंबाबत जागरूक करण्‍यासाठी राबवलेल्‍या या उपक्रमाकरिता फोर्टिस हॉस्पिटल कल्‍याणचे मनापासून आभार व्‍यक्‍त करतो. या सत्राच्‍या माध्‍यमातून उपस्थितांना प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांसह जीवनशैली बदल आणि जोखीमयुक्‍त लक्षणांचे लवकर निदान याबाबत माहिती मिळाली, ज्‍यामुळे त्‍यांना स्‍वत:चे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यास मदत होईल आणि भविष्‍यात गंभीर गुंतागूंतींचा धोका कमी होईल.”

हे देखील वाचा: थायरॉईडसाठी अमृतासमान आहे या बियांचं पाणी

या सत्राबाबत मत व्‍यक्‍त करत डॉ. झाकिया खान म्‍हणाल्‍या, ”फोर्टिसमध्‍ये आम्‍हाला ज्‍येष्‍ठ नागरिकांना सामना कराव्‍या लागणाऱ्या आरोग्‍यसंबंधित आव्‍हानांबाबत माहित आहे. उदयास आलेल्‍या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अधिक प्रमाणात माहिती उपलब्‍ध आहे आणि अधिकाधिक व्‍यक्‍ती ऑनलाइन आरोग्‍याबाबत मत जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न करतात, जे धोकादायक ठरू शकते. ही जागरूकता मोहिम ज्‍येष्‍ठ नागरिकांना त्‍यांचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍याबाबत योग्‍य निर्णय घेण्‍यास मदत करण्‍यासाठी राबविण्‍यात आली आहे.”

Web Title: Fortis hospital kalyan organizes awareness session for senior citizens in collaboration with kalyan dombivli municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 01:25 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Senior Citizen

संबंधित बातम्या

रोजच्या आहारात नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ! शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा, दिसाल अधिक तरुण
1

रोजच्या आहारात नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ! शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा, दिसाल अधिक तरुण

मुतखड्याचा वेदनांनी हैराण झाला आहात? किडनी निकामी होण्याआधी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, स्टोन पडून जाईल बाहेर
2

मुतखड्याचा वेदनांनी हैराण झाला आहात? किडनी निकामी होण्याआधी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, स्टोन पडून जाईल बाहेर

लघवी मार्गात वारंवार संसर्ग का होतो? UTI इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, अन्यथा मूत्राशयावर होईल परिणाम
3

लघवी मार्गात वारंवार संसर्ग का होतो? UTI इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, अन्यथा मूत्राशयावर होईल परिणाम

High BP: फक्त मोठ्यांनाच नाही! लहान मुलांनाही होऊ शकतो हाय ब्लड प्रेशर, जाणून घ्या कारणे
4

High BP: फक्त मोठ्यांनाच नाही! लहान मुलांनाही होऊ शकतो हाय ब्लड प्रेशर, जाणून घ्या कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.