Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सासरच्या लोकांमुळे नवरा-बायकोच्या नात्यामध्ये सतत वाद होतात? मग फॉलो करा ‘या’ टिप्स, भांडण होतील कमी

नात्यांमध्ये वाढलेला तणाव कमी करण्यासाठी आर्थिक निर्णय, घरातील जबाबदारी, वैयक्तिक गोष्टी, मुलांची जबाबदारी दोघांनी एकत्र मिळून घेणे फार आवश्यक आहे. यामुळे घरात भांडण होत नाही आनंदी वातावरण कायम राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 27, 2026 | 03:40 PM
सासरच्या लोकांमुळे नवरा - बायकोच्या नात्यामध्ये सतत वाद होतात? मग फॉलो करा 'या' टिप्स, भांडण होतील कमी

सासरच्या लोकांमुळे नवरा - बायकोच्या नात्यामध्ये सतत वाद होतात? मग फॉलो करा 'या' टिप्स, भांडण होतील कमी

Follow Us
Follow Us:

‘तुझी आई असंच का बोलली, काय गरज होती, तुझी बहीण तर काही करतच नाही’, लग्नानंतर नवरा बायकोमधील हा संवाद प्रत्येक घरी ऐकायला येतो. सासरच्या व्यक्तींमुळे नवरा आणि बायकोमध्ये भांडण होणं हे अगदी सामान्य आहे आणि बऱ्याच घरांमध्ये हे घडतंही. तर काही घरांमध्ये हा वाद इतका विकोपाला जातो की, सासूमुळे घटस्फोट घेतल्याच्या घटनाही आपल्याकडे घडलेल्या आहेत. पण सासरच्या व्यक्तींमुळे हे वाद घडू नयेत यासाठी नक्की काय करायचं आणि नातं कसं जपायचं आपण आज जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

प्लांट-बेस्ड फूडची वाढती क्रेझ; KLAW Snacks ने Freshpik मध्ये Signature Series केली लॉन्च,चवीसोबत आरोग्यावरही भर

सर्वात पहिल्यांदा समस्या नेमकी कोणती आहे ते ओळखणं गरजेचे आहे. म्हणजे काय तर वाद सासरच्या लोकांमुळे होतोय की, तुमच्या दोघांच्या स्वभावामुळे वा अपुऱ्या संवादामुळे ते आधी ओळखा. समस्येचं मूळ कारण काय आहे, नेमका वाद कोणत्या विषयांवर होतोय, निर्णय घेताना कोणाचा हस्तक्षेप होतोय यावर आधी चर्चा करा. तरच यातून काहीतरी योग्य मार्ग निष्पन्न होईल.

मी तुझ्याच बाजूने आहे ही खात्री जोडीदाराला देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नवरा किंवा बायकोला ‘सतत तुझ्याच घरच्यांची बाजू घेत आहेस ’ असं वाटत असेल तर दोघांमधील दुरावा वाढतो आणि वादही विकोपाला जातात. पण ‘मला तुझं म्हणणं आणि मन समजतंय आणि आपण दोघं मिळून यावर तोडगा काढू’ असं जर नवरा म्हणत असेल तर हे वाद टाळायला मदत मिळेल आणि कठीण प्रसंगात तुम्ही त्यांच्याबरोबर आहात हा आधार त्यांना मिळतो.

दोघांनीही आदराने मर्यादा ठरवा. आर्थिक निर्णय, घरातील जबाबदारी, वैयक्तिक गोष्टी, मुलांची जबाबदारी हे सर्व एकत्र ठरवावे आणि त्यात कोणालाही तिसऱ्या व्यक्तींना हस्तक्षेप करू देऊ नये. ठामपणे तुम्ही सासरच्या व्यक्तींच्या लक्षात आणून द्या. पण त्यात अनादर नसावा हे नक्की.

मुलांच्या खोटं बोलण्याची सवय कशी थांबवावी? पालकांसाठी जाणून घ्या ‘या’ खास टिप्स, मुलांच्या सवयींमध्ये होतील बदल

तसंच कोणाहीसमोर आपल्या जोडीदाराचा अपमान करू नका. रागाच्या भरात सासरच्यांंना वाईट बोलू नका. तुझ्या घरचे असेच आहेत, तुमच्या वागण्यामुळेच सर्व बिघडतं अशी वाक्य भांडणाला कारणीभूत ठरतात. तसंच तुमचा लहानसा वाद हा घरच्यांपर्यंत अजिबात पोहचवू नका. आधी एकांतात चर्चा करा आणि सोडविण्याचा प्रयत्न करा. गरज भासल्यास कौन्सिलरची मदत घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोघांच्या संसारात मी विरूद्ध तू नाही तर आपण दोघं विरूद्ध समस्या हेच समीकरण असावं. सासरच्यांमुळे मतभेद झाले तरी जोडीदाराला मात्र शत्रू होऊ देऊ नका तरच नातं टिकायला मदत होईल.

Web Title: Frequent arguments with your partner because of in laws these tips can help

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • LIFESTYLE
  • Love Relationship tips
  • relationship advice

संबंधित बातम्या

श्रावण सोमवार आणि सत्यनारायण पूजेचे काय आहे विशेष महत्त्व? जाणून घ्या शास्त्रीय अर्थ
1

श्रावण सोमवार आणि सत्यनारायण पूजेचे काय आहे विशेष महत्त्व? जाणून घ्या शास्त्रीय अर्थ

सोळा सोमवारचे उद्यापन कसे करावे? पूजेपासून दान-दक्षिणेपर्यंत सर्वकाही जाणून घ्या
2

सोळा सोमवारचे उद्यापन कसे करावे? पूजेपासून दान-दक्षिणेपर्यंत सर्वकाही जाणून घ्या

दूध गरम करताना ‘या’ चुका करणे टाळा! दूध फाटण्यासोबतच चवीमध्ये सुद्धा होईल बदल
3

दूध गरम करताना ‘या’ चुका करणे टाळा! दूध फाटण्यासोबतच चवीमध्ये सुद्धा होईल बदल

मुलांच्या खोटं बोलण्याची सवय कशी थांबवावी? पालकांसाठी जाणून घ्या ‘या’ खास टिप्स, मुलांच्या सवयींमध्ये होतील बदल
4

मुलांच्या खोटं बोलण्याची सवय कशी थांबवावी? पालकांसाठी जाणून घ्या ‘या’ खास टिप्स, मुलांच्या सवयींमध्ये होतील बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.