मुलांच्या खोटं बोलण्याची सवय कशी थांबवावी? पालकांसाठी जाणून घ्या ‘या’ खास टिप्स, मुलांच्या सवयींमध्ये होतील बदल
काही वेळा आपलं मूल आपल्याशी खोटं बोलतं आणि हे कळल्यानंतर पालकांना राग अनावर होतो. काही पालक लगेच रागावतात तर काही जण खोटं बोलणं कसं चुकीचं आहे समजावून सांगतात. पण असं करूनही मूल खोटं बोलायचं थांबत नाही. पण मुलं नक्की खोटं का बोलतात आणि ही सवय कशी सोडवायची हे आधी पालकांनी समजून घेतलं पाहिजे. तुम्हीही पालक म्हणून या चिंतेत असाल तर हा व्हिडिओ तुमची नक्की मदत करेल.(फोटो सौजन्य – istock)
मुलांनी खोटं बोलण्याची नक्की काय कारणं आहेत ते आपण आधी समजून घेऊया. बहुतेक प्रकरणांमध्ये मुले तीन कारणांमुळे खोटे बोलतात. पहिले कारण म्हणजे मुलांना वाटतं की पालक म्हणून तुम्ही त्यांना समजून घेत नाही. किशोरवयात मुलाच्या आयुष्यात मित्र आणि शाळा खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. मित्रांशी झालेले भांडण, मित्राने बाहेर न बोलावणे किंवा मित्रांमधील समस्या पालकांना लहान वाटू शकतात, पण मुलासाठी या गोष्टी खूप मोठ्या असतात. जर एखादे मूल तुमच्याकडे एखादी समस्या घेऊन आले, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. “एवढ्या लहानशा गोष्टीवरून तू इतका का अस्वस्थ झाला आहेस?” असे म्हणू नका. त्याऐवजी, शांतपणे ऐका. त्यांना कसे वाटत आहे हे विचारा आणि त्यांची समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा मुलाला समजून घेतल्यासारखे वाटते, तेव्हा ते अधिक मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करण्याची शक्यता असते.
बऱ्याच मुलांना भीती वाटते की, जर त्यांनी त्यांच्या चुकांबद्दल किंवा वाईट निकालांबद्दल सत्य सांगितले, तर त्यांचे पालक खूप रागावतील. या भीतीमुळे ते गोष्टी लपवतात किंवा खोटे बोलतात. अशा परिस्थितीत, मुलावर लगेच रागावण्याऐवजी, त्यांच्याशी बोला. चूक कुठे झाली आणि भविष्यात ती कशी सुधारायची हे शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मुलाला हे समजावून सांगणे महत्त्वाचे आहे की कमी गुण मिळाल्याने किंवा चूक केल्याने ते वाईट मूल ठरत नाहीत. चुकांमधून शिकणे अधिक महत्त्वाचे आहे.
किशोरवयात, मुलांना नवीन गोष्टी शिकायच्या असतात आणि स्वतःचे निर्णय घ्यायचे असतात. त्यांना मित्रांसोबत बाहेर जायचे असते, नवीन ठिकाणी भेट द्यायची असते किंवा काहीतरी नवीन करून बघायचे असते. जर पालक मुलांचे न ऐकता त्यांच्या प्रत्येक गोष्टीला सरळ ‘नाही’ म्हणत राहिले, तर मुलांना सत्य सांगण्यात काही अर्थ नाही असे वाटू शकते आणि ते खोटं बोलून बाहेर जातात.
मुलांना नियंत्रणाची नाही, तर विश्वासाची गरज असते. त्यामुळे जेव्हा तुमचे मूल तुमच्याशी खोटे बोलेल, तेव्हा फक्त “तो खोटे का बोलला?” असा विचार करू नका, तर “सत्य सांगायला तो का घाबरला?” असाही विचार करा.
Ans: मुलं शिक्षा होण्याची भीती, पालकांची नाराजी टाळणे, स्वतःची चूक लपवणे, लक्ष वेधून घेणे किंवा कल्पनाशक्तीमुळे खोटं बोलू शकतात. त्यांच्या वय आणि परिस्थितीनुसार कारण वेगवेगळे असू शकते.
Ans: वारंवार ओरडणे किंवा कठोर शिक्षा करणे टाळावे. त्यामुळे मुलांना सत्य सांगण्याची आणखी भीती वाटू शकते. शांतपणे कारण विचारून त्यांना प्रामाणिकपणे बोलण्यासाठी सुरक्षित वातावरण देणे अधिक उपयुक्त ठरते.
Ans: मुलांनी सत्य सांगितल्यावर त्यांचे कौतुक करा. चूक झाली तरी ती प्रामाणिकपणे सांगितल्यास समस्या शांतपणे सोडवता येते, हे त्यांना समजावून सांगा. पालकांनी स्वतःही प्रामाणिक वर्तनाचे उदाहरण ठेवणे महत्त्वाचे आहे.






