मासिक पाळीच्या चक्रात बिघाड झाल्यानंतर उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित 'हे' गंभीर आजार
जीवनशैलीतील बदलांचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयी, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव, अपुरी झोप, कामाचा वाढलेला ताण, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीराला हानी पोहचते. सर्वच महिलांना महिन्यातील चार किंवा पाच दिवस मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात अनेक बदल होऊ लागतात. पण हल्ली अनेकांमध्ये मासिक पाळीसंबंधित समस्या उद्भवू लागल्या आहेत. मासिक पाळीच्या चक्रात बिघाड झाल्यानंतर गर्भधारणेमध्ये अडथळे, PCOD, PCOS इत्यादी समस्या उद्भवू लागतात. या समस्या अनेकांना अतिशय सामान्य वाटतात. पण यामुळे महिलांचे आरोग्य बिघडू शकते. मासिक पाळीच्या चक्रात बदल झाल्यानंतर हार्मोन्सचे असंतुलन होते, ज्यामुळे वजन वाढणे किंवा शरीरावर अनावश्यक केस येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.(फोटो सौजन्य – istock)
Live-In मध्ये राहणं का ठरतंय तरूणांसाठी पहिली पसंती? संबंधित कायदा जाणून घ्यायलाच हवा
मासिक पाळीचे चक्र बिघडल्यानंतर महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात. या समस्यांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. रोजच्या आहारात झालेल्या अन्नपदार्थांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच हेल्दी आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या चक्रात बिघाड झाल्यानंतर आरोग्यासंबंधित कोणते गंभीर आजार होण्याची शक्यता असते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
बऱ्याचदा सणावाराच्या दिवसांमध्ये मासिक पाळी लवकर येऊ नये म्हणून महिला गोळ्यांचे सेवन करतात. या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे मासिक पाळी काही दिवसांसाठी पुढे जाते. मात्र या गोळ्यांचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, मासिक पाळीच्या नैसर्गिक चक्रात बिघाड झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्याही गंभीर समस्या उद्भवू लागतात.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे आहारात अनेक बदल दिसून येतात. या बदलांमुळे मासिक पाळीच्या चक्रात अनेक बदल दिसून येतात. यामुळे गर्भधारणा होण्यास अनेक अडथळे निर्माण होतात. याशिवाय पीसीओएस झाल्यानंतर गर्भधारणेत अनेक अडथळे निर्माण होतात.
पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स कमी करण्यासाठी ग्रीन टी मध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, कायमच दिसाल स्लिम
पुरुषांसह महिलासुद्धा धूम्रपान, मद्यपान आणि इतर व्यसनांच्या आहाराची गेल्या आहेत. या व्यसनांचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. याशिवाय पचनसंस्था बिघडते. सतत धूम्रपान केल्यामुळे मासिक पाळीच्या चक्रात अनेक बदल होतात.
शरीराचे मानसिक संतुलन बिघडल्यानंतर मासिक पाळी काहीवेळा पुढे जाते. ही अतिशय सामान्य समस्या आहे. पण शरीरात वाढलेल्या तणावामुळे आरोग्याला हानी पोहचते. मानसिक अस्थिरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.
मासिक पाळी म्हणजे काय.
मासिक पाळी हा स्त्रियांच्या शरीरातील एक नैसर्गिक भाग आहे, ज्यात गर्भाशयाचे अस्तर रक्त आणि ऊतकांसह योनीमार्गातून बाहेर पडते. मासिक पाळीचा काळ किती असतो.
मासिक पाळीत काय सामान्य आहे आणि काय नाही?
मासिक पाळीच्या सुरुवातीच्या वर्षांत अनियमितता असणे सामान्य आहे, परंतु काही विशिष्ट समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मासिक पाळी न आल्यास काय करावे.