Ganesh Chaturthi 2024: बाप्पाने पहिल्यांदा मोदक कधी आणि कुणाकडे खाल्ला? जाणून घ्या रंजक कथा
गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र गणेशाच्या आगमनाची सुरुवात झाली आहे. गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील एक प्रमुख सण आहे, हा सण फक्त महाराष्ट्रातच नाही देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. आता ठिकठिकाणी गणपतीचे मोठमोठे पंडाल लावण्यात आले आहेत. मेजवानीची तयारी सुरु झाली आहे. आता गणपतीसाठीची मेजवानी आणि त्यात मोदक नाही असे तर होऊच शकत नाही.
मोदक हा पदार्थ बाप्पाच्या सर्वात जवळचा आणि आवडीचा पदार्थ मानला जातो. नेहमी गणपतीच्या नैवेद्यासाठी हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. आपण अनेकदा हे मोदक देवासाठी बनवले असतील यांचा आस्वाद घेतला असेल मात्र हे मोदक कसे बनवले गेले आणि बाप्पाने हे मोदक प्रथम कधी खाल्ले तुम्हाला माहिती आहे का? नाही तर मग आजच या मोदकांची रंजक कथा जाणून घ्या. आज आम्ही तुम्हाला या लेखातून मोदक आणि गणपतीचा काय संबंध आहे ते सविस्तर सांगणार आहोत.
हेदेखील वाचा – बाप्पाला आवडतात कुरमुऱ्याचे लाडू; एकदा खाऊन तर पहा! तुम्हालाही आवडेल
हिंदू पौराणिक कथेनुसार हा गोड पदार्थ गणपतीला अतिप्रिय आहे. पौराणिक कथेनुसार, एके दिवशी ऋषी अत्रि यांची पत्नी अनुसूया देवीने भगवान शंकरांना आपल्या कुटुंबासह आपल्या घरी जेवायला आमंत्रित केले होते. या निमंत्रणात भगवान शिव आपल्या कुटुंबासह दाखल झाले. देवी अनुसयाने सर्वांना विनंती केली की, गणपती बाप्पा जेवण संपवतील तेव्हाच मेजवानीला बसावे. पण छोटा गणपती पुन्हा पुन्हा जेवण मागत राहिला मात्र त्यांचे पोट काही केल्या भरत नव्हते.
हे पाहूनमाता पार्वतीने जेवल्यानंतर गणेशाला एक मोदक खाण्यासाठी दिला ज्याला खाताच गणोबाचे पोट भरले आणि त्यांनी एक ढेकरदेखील दिली. यानंतर माता पार्वतीने देवी अनुसूयाला विनंती केली की आता ती आपल्या उर्वरित पाहुण्यांना मेजवानीसाठी बसवू शकते, कारण भगवान गणेश संतुष्ट झाले आहेत. हे पाहून अनुसूया देवी आश्चर्यचकित झाली आणि तिने पार्वतींकडून त्याची रेसिपी मागितली. यानंतर पार्वतीजींनी विनंती केली की, आपल्या पुत्राच्या सर्व भक्तांनी तिला एकवीस मोदक अर्पण करावेत, असे केल्यास देव प्रसन्न होतील आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल.
हेदेखील वाचा – UP’च्या या शहरात वसला आहे 5500 वर्षे जुना प्राचीन कंस किल्ला, वाचा आणि जाणून घ्या
पाकशास्त्रीय इतिहासकारांच्या मते, मोदक हा एक प्राचीन गोड पदार्थ आहे जो सुमारे 200 ईसापूर्व पासून अस्तित्वात आहे. असे म्हटले जाते की आयुर्वेद, रामायण, महाभारतात देखील याचा उल्लेख आहे जेथे गोड भरणासह गोड स्टफिंग म्हणून वर्णन केले आहे. त्याच वेळी, काही लोकांचा असा विश्वास आहे की या स्वीट डंपलिंगचा शोध चिनी वैद्यकीय व्यवसायी झांग झोंगजिंग यांनी लावला होता. तो पूर्वेकडील हान राजवंशातील होता.
मोदक भारतात अनेक प्रकारे बनवले जातात आणि वेगवेगळ्या नावांनीही ओळखले जातात. त्याची सर्वात लोकप्रिय व्हर्जन उकडीचे मोदक असे आहे, जे तुपासह गरमा गरम खाल्ले जातात. मोदकांचा उगम सर्वप्रथम महाराष्ट्रात झाला असे मानले जाते, परंतु ते कसे तयार झाले आणि कोणी तयार केले हे पूर्णपणे माहित नाही.
भारतात मोदकाला अनेक नावे आहेत, जसे तमिळमध्ये याला मोथागम किंवा कोझुकट्टाई म्हणतात. तेलुगूमध्ये याला कुडूम म्हणतात आणि कन्नडमध्ये मोधाका किंवा कडुबू म्हणून ओळखले जाते. हे विशेषतः गणेश चतुर्थीच्या वेळी बनवले जातात. मोदक हे तांदळाचे पीठ, गूळ, ताजे किसलेले खोबरे, ड्राय फ्रुट्स आणि तुपापासून तयार केले जाते. हा एक गोडाचा पदार्थ आहे.