
Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या नैवेद्याची शान वाढवेल कुरकुरीत कोथिंबीर वडी; नोट करा पारंपरिक रेसिपी
गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला अनेक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्याच्या या ताटात मोदक, मसाले भात, भजी अशा विविध पदार्थांचा समावेश होतो. नैवेद्याच्या ताटाची ही मजा तुम्ही आणखीन एका पदार्थाने द्विगुणित करू शकता आणि हा पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी. कुरकुरीत चवीची ही खमंग वडी महाराष्ट्राच्या पारंपरिक पदार्थांपैकी एक आहे.
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा वाटपाची डाळ, नोट करा रेसिपी
ताज्या हिरव्या कोथिंबिरीपासून बनणारी ही वडी चविष्ट, खमंग आणि पौष्टिक असते. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या वेळेस चहा बरोबर किंवा पाहुणचाराला पटकन बनवता येणारा हा उत्तम पर्याय आहे. कोथिंबीर वडी वाफवून किंवा तळून दोन्ही प्रकारे खाऊ शकतो. वाफवलेली वडी थोडी हेल्दी तर तळलेली वडी खुसखुशीत लागते. बाप्पाच्या आगमनाच्या या मंगल प्रसंगी तुम्ही घरी कोथिंबीर वडीचा बेत करू शकता. चला तर मग लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती
कोथिंबीर वडी उकडून खाता येते का?
होय, तुम्ही न तळताही कोथिंबीर वडी उकडून खाऊ शकता, हा एक हेल्दी पर्याय आहे.