गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा वाटपाची डाळ
भारतीय जेवणाच्या ताटामध्ये कायमच भात, डाळ, भाजी, चपाती हे प्रमुख पदार्थ कायमच असतात. या पदार्थांशिवाय जेवणाचे ताटात अपूर्ण दिसते. जेवणातील डाळ बनवतना अनेक वेगवेगळ्या डाळींचा वापर केला जातो. कधी तुरीची डाळ वापरली जाते तर कधी मुगाच्या डाळीचे वरण बनवले जाते. डाळ बदलल्यानंतर डाळीची चव सुद्धा बदलते. कोकणात सणावाराच्या दिवसांमध्ये पारंपरिक पद्धतीने वाटपाची डाळ बनवली जाते. वाटपाची डाळीची चव अतिशय सुंदर लागते. खोबऱ्याचं वाटण टाकून बनवलेली डाळ जर जेवणाच्या ताटात असेल तर चार घास जास्त जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये वाटपाची डाळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गरमागरम वाफाळत्या भातासोबत वाटपाची डाळ अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया कोकणातील पारंपरिक पद्धतीने वाटपाची डाळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)






