Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओठांवर येईल नॅचरल गुलाबी रंग! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच तयार करा लिपबाम, विकतचे प्रॉडक्ट वापरणे कायमचे जा विसरून

ओठांवर जमा झालेली डेड स्किन घालवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला लिपबाम ओठांवर लावावा. यामुळे ओठांवर नॅचरल ग्लो राहतो आणि ओठ गुलाबी, मुलायम दिसतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 26, 2026 | 09:57 AM
ओठांवर येईल नॅचरल गुलाबी रंग! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच तयार करा लिपबाम

ओठांवर येईल नॅचरल गुलाबी रंग! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच तयार करा लिपबाम

Follow Us
Follow Us:

सुंदर दिसण्यासाठी सर्वच महिला वेगवेगळे स्किन केअर रुटीन फॉलो करतात. फेसवॉश, फेसपॅक, सनस्क्रीन, लिपबाम, टोनर इत्यादी अनेक गोष्टी चेहऱ्यावर कायमच लावल्या जातात. त्वचेची वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेतली जाते. पण कायमच चेहऱ्याची काळजी घेतली जाते. ओठांच्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. ओठांवर त्वचा निस्तेज आणि काळी पडल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे प्रॉडक्ट किंवा लिपबाम लावून ओठांवर जमा झालेली डेड स्किन घालवण्याचा प्रयत्न केला जातो. पण तरीसुद्धा ओठ चमकदार किंवा गुलाबी दिसत नाही. मेकअप केल्यानंतर ओठांवर लिपस्टिक किंवा लिपबाम लावले जाते. लिपबाम लावल्यामुळे ओठांवरील त्वचा हायड्रेट राहण्यासोबतच ओठ मऊ दिसतात.(फोटो सौजन्य – istock)

Hair Care Tips: झाडूसारखे रुक्ष केस होतील मुलायम आणि चमकदार! स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ केसांसाठी ठरतील वरदान

त्वचेच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी ओठांवर लिपस्टिक लावली जाते. पण ओठांवर लावलेली लिपस्टिक वेळीच स्वच्छ न केल्यामुळे ओठांवरील त्वचा काळी होऊन जाते आणि डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते. ओठांवर जमा झालेली डेड स्किन घालवण्यासाठी महिला वेगवगळ्या लीप ट्रीटमेंट किंवा लीप स्क्रब करतात. पण यामुळे फारसा फरक दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गुलाबी आणि मुलायम ओठांसाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून लिपबाम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गुलाबाच्या पाकळ्या ओठ हायड्रेट करण्यास मदत करतात.

गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच तयार करा लिपबाम:

लिपबाम बनवण्यासाठी सर्वप्रथम, गुलाबाच्या पाकळ्या पाण्याने स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावर कोरड्या होण्यासाठी ठेवा. त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या ठेचून खोबरेल तेलात मिक्स करा. तयार केलेले मिश्रण डबल बॉईलर पद्धतीने गरम करा. यामुळे गुलाबाच्या पाकळ्यांचा अर्क तेलात मिक्स होईल. तयार केलेले मिश्रण गाळून घ्या आणि त्यात विटामिन ई कँप्सूल मिक्स करा. त्यानंतर त्यात मध, व्हॅसलिन घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण ७ ते १० मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्या. यामुळे क्रिमी टेक्स्चर येईल. तयार केलेले लिपबाम काचेच्या हवाबंद डब्यात भरून ठेवा . जेणेकरून छान सेट होईल. लिपबाम व्यवस्थित टिकून राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे पायांवरील खाज – फंगल इन्फेक्शनचा धोका वाढला आहे? ‘हे’ सोपे उपाय केल्यास बॅक्टेरिया होतील नष्ट

गुलाबाच्या पाकळ्या ओठांचा नैसर्गिक रंग कायम टिकवून ठेवतात. ओठांवर जमा झालेली डेड स्किन घालवण्यासाठी आणि ओठ हायड्रेट ठेवण्यासाठी घरी बनवलेले लिपबाम ओठांवर लावावे. मधाच्या वापरामुळे काळवंडलेला रंग सुधारण्यास मदत होते आणि ओठ मऊ होतात. दिवसाभरातुन दोनदा किंवा तीनदा ओठांवर लिपबाम लावल्यास ओठ मऊ होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Get a natural pink tint on your lips make your own lip balm at home using rose petals and forget about store bought products forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • home remedies
  • lip care tips
  • skin care tips

संबंधित बातम्या

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
1

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस
2

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस

Skin Care Tips: चेहऱ्यावरील वांग आणि काळ्या डागांमुळे हैराण झाला आहात? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, चेहऱ्यावर येईल ग्लो
3

Skin Care Tips: चेहऱ्यावरील वांग आणि काळ्या डागांमुळे हैराण झाला आहात? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, चेहऱ्यावर येईल ग्लो

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट
4

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.