Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care: लग्नाच्या २ महिने आधीपासूनच घ्या केसांची काळजी! घनदाट केसांसाठी आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ उपाय केल्यास केस होतील घनदाट

Hair Care: केसांच्या घनदाट वाढीसाठी आजीबाईच्या बटव्यातील उपाय करावेत. नैसर्गिक पदार्थांचा वापर केसांच्या वाढीसाठी केल्यास केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते आणि केस सुंदर दिसतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 22, 2026 | 05:30 AM
लग्नाच्या २ महिने आधीपासूनच घ्या केसांची काळजी! घनदाट केसांसाठी आजीबाईच्या बटव्यातील 'हा' उपाय केल्यास केस होतील घनदाट

लग्नाच्या २ महिने आधीपासूनच घ्या केसांची काळजी! घनदाट केसांसाठी आजीबाईच्या बटव्यातील 'हा' उपाय केल्यास केस होतील घनदाट

Follow Us
Follow Us:

Hair Care: लग्नसराईच्या दिवसांना लवकरच सुरुवात होणार आहे. लग्नाच्या चार ते पाच महिने आधीपासून खरेदीला तयारी केली जाते. लग्नाच्या खरेदीसोबतच त्वचा आणि केसांची खूप जास्त काळजी घेतली जाते. केसांची काळजी घेताना अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. हेअर केअर रुटीन, केसांच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट, महागडे प्रॉडक्ट इत्यादी अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. पण वातावरणात होणारे बदल आणि कामाच्या धावपळीमध्ये केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जातात आणि केस खूप जास्त पातळ होतात. केस गळणे, केस कोरडे पडणे, केसांमध्ये कोंडा होऊन केसांची गुणवत्ता खराब होते.(फोटो सौजन्य – istock)

Hair Growth: केसांची खुंटलेली वाढ होईल वेगाने! जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर टोनर, केसांना मिळेल पोषण

लग्नात केस व्यवस्थित नसल्यामुळे हेअर स्टाईल करताना हेअर एक्सटेंशनचा वापर केला जातो. तसेच केस व्यवस्थित सेट करण्यासाठी सेटिंग स्प्रे सुद्धा वापरले जातात. त्यामुळे लग्नाआधी केस घनदाट आणि मजबूत होण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील हा उपाय करणे फायदेशीर ठरेल. पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. लग्नाच्या दोन महिने आधीपासून या तेलाचा नियमित वापर केल्यास केस सुंदर आणि चमकदार होतील.

आजीबाईच्या बटव्यातील तेल बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • कांदा
  • कलौंजी
  • मेथी दाणे
  • खोबऱ्याचे तेल
  • मोहरीचे तेल
  • कढीपत्ता
  • विटामिन ई कॅप्सूल

कृती:

तेल बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात चिरलेला कांदा, कलौंजी, मेथी दाणे आणि कढीपत्ता घेऊन जाडसर वाटून घ्या. वाटून झाल्यानंतर लोखंडी कढईमध्ये खोबरेल तेल आणि मोहरीचे तेल एकत्र करून त्यात तयार केलेले कांद्याचे मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर कढई गॅसवर ठेवून मंद आचेवर सर्व साहित्य शिजवून घ्या. १० ते १२ मिनिटं व्यवस्थित उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्या. कांद्याचा अर्क तेलामध्ये उतरेपर्यंत मिश्रण शिजवून घ्यावे. तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतर कॉटनच्या कपड्यावर ओतून गाळून घ्या. तयार केलेल्या तेलामध्ये विटामिन ई कँप्सूल ओतून मिक्स करा आणि हवाबंद डब्यात भरून ठेवा.

Skincare Routine: मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा होईल कमी! अंघोळी करण्याआधी शरीराला लावा ‘हा’ बॉडी मास्क

तयार केलेले तेल केस धुवण्याच्या १ ते २ तास आधी केसांवर लावावे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तेल कोमट करून संपूर्ण केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. तुमच्या सोयीनुसार केसांमध्ये तेल रात्रभर सुद्धा लावून ठेवू शकता. सकाळी उठल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून टाका. केस स्वच्छ करताना सौम्य शाम्पूचा वापर करावा. केसांच्या वाढीसाठी केवळ तेलावर अवलंबून न राहता, आहारात अंडी, पनीर, चिकन, मासे, डाळी आणि कडधान्ये इत्यादी पदार्थांचा समावेश करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Hair care start taking care of your hair two months before your wedding try this remedy from grandmas collection of traditional tips to get thick sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • hair care tips in marathi
  • hair fall reason
  • home remedies

संबंधित बातम्या

Skincare Routine: मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा होईल कमी! अंघोळी करण्याआधी शरीराला लावा ‘हा’ बॉडी मास्क
1

Skincare Routine: मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा होईल कमी! अंघोळी करण्याआधी शरीराला लावा ‘हा’ बॉडी मास्क

Hair Growth: केसांची खुंटलेली वाढ होईल वेगाने! जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर टोनर, केसांना मिळेल पोषण
2

Hair Growth: केसांची खुंटलेली वाढ होईल वेगाने! जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर टोनर, केसांना मिळेल पोषण

Skin Care: सैल त्वचा होईल टाईट! गोकर्णाच्या फुलांपासून घरीच तयार करा नाईट क्रीम, चेहऱ्यावरील काळे डाग- सुरकुत्या होतील गायब
3

Skin Care: सैल त्वचा होईल टाईट! गोकर्णाच्या फुलांपासून घरीच तयार करा नाईट क्रीम, चेहऱ्यावरील काळे डाग- सुरकुत्या होतील गायब

Hair Care Tips: केसांना मिळेल भरपूर पोषण! रोजच्या आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश, केसांची मूळ होतील मजबूत
4

Hair Care Tips: केसांना मिळेल भरपूर पोषण! रोजच्या आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश, केसांची मूळ होतील मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.