
आयब्रो सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी करा 'हे' सोपे घरगुती उपाय
Eyebrow Hair Care: चेहऱ्यावरील सौंदर्यात वाढवणे आणि डोळे आकर्षक दिसण्यासाठी भुवयांची भूमिका अतिशय म्हत्वाची आहे. चेहऱ्याला एक योग्य आणि परिपूर्ण करण्यासाठी दाट व सुंदर आयब्रो असणे फार आवश्यक आहे. पण बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने आयब्रो केल्यामुळे शेप पू्र्णपणे खराब होऊन जातो. चुकीच्या पद्धतीने थ्रेडिंग केल्यामुळे आयब्रो खूप जास्त पातळ होऊन जातात. काहींच्या भुवयांवरील केस खूप जास्त पातळ असतात, तर काहींच्या भुवयांवरील केस अतिशय दाट असतात. चुकीच्या पद्धतीने थ्रेडिंग किंवा लेझरने आयब्रो केल्यास केस खूप पातळ होऊन पातळ होतात.(फोटो सौजन्य – istock)
भुवयांवरील केस पातळ झाल्यानंतर पुन्हा एकदा सुंदर दिसावे, यासाठी बाजारात मिळणारे महागडे आयब्रो सीरम किंवा विविध रासायनिक उत्पादनांचा वापर केला जातो. महागडे आयब्रो सीरम किंवा रासायनिक उत्पादने काही काळापुरते परिणाम करतात. बाजारातील केमिकल्सचा वापर केल्यामुळे आयब्रोवरील केसांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करण्याऐवजी स्वंयपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. चला तर जाणून घेऊया भुवयांची झपाट्याने वाढ होण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.
आयब्रो तात्पुरता दाट किंवा सेट करण्यासाठी बाजारातील हेअर जेल किंवा वॅक्सचा वापर केला जातो. पण यामुळे काहीवेळा त्वचेवर वाईट परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. त्वचेवर जळजळ किंवा ॲलजी येऊन भुवयांचे केस कडक किंवा सहज तुटू शकतात. जेल सुकल्यानंतर भुवयांवरील केस खूप जास्त कडक होऊन जातात. त्यामुळे नेहमीच नैसर्गिक उपाय करणे फायदेशीर ठरेल. भुवयांची वाढ सुधारण्यासाठी आणि नवीन केस वेगाने उगवण्यासाठी मिनोक्सिडिलचा वापर केला जातो. पण मिनोक्सिडिलचा वापर करताना डाॅक्टरांचा योग्य सल्ला घेणे फार आवश्यक आहे.
मिनोक्सिडिल डोक्याच्या केसांप्रमाणेच इतर भागांमधील केसांची वाढ करण्यास मदत करतात. हे औषध थेट केसांच्या मुळांवर लावले जाते, ज्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि हेअर फॉलिकल्समध्ये रक्ताचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. केसांच्या मुळांना आवश्यक ताकद मिळून नवीन केस झपाट्याने वाढण्यास मदत होते. मिनोक्सिडिलच्या लिक्विड स्वरुपाचा वापर केसांच्या वाढीसाठी केला जातो. मस्करा ब्रशच्या साहाय्याने कमी प्रमाणात मिनोक्सिडिल घेऊन भुवयांवरील केसांवर लावावे. यासोबतच विरळ आयब्रो शेपमध्ये आणि नीटनेटक्या सेट करण्यासाठी जेल किंवा वॅक्सऐवजी पेट्रोलियम जेलीचा वापर सुद्धा करू शकता. यामुळे भुवयांचे कोणतेही नुकसान होणार नाही.
Ans: घरगुती उपायांचे परिणाम दिसण्यासाठी साधारणपणे ४ ते ६ आठवडेनियमित वापर करावा लागतो.
Ans: एरंडेल तेल सुरक्षित आहे, पण ते थोडे घट्ट असते.
Ans: आयब्रो ब्रशने रोज केस विंचरा, यामुळे रक्ताभिसरण सुधारते.