झाडूसारखे रुक्ष केस होतील मुलायम आणि चमकदार! स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ केसांसाठी ठरतील वरदान
वर्षाच्या बाराही महिने महिलांसह पुरुषांना केसांच्या समस्या उद्भवतात. केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. पण वय वाढल्यानंतर किंवा तरुण वयात मोठ्या प्रमाणावर केस गळत असतील तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा केसांमध्ये टक्कल पडू शकते. तसेच वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे केस खूप जास्त निस्तेज आणि झाडूसारखे कोरडे होऊन जातात. कोरडे केस पुन्हा एकदा चमकदार आणि सुंदर करण्यासाठी केराटिन ट्रिटमेंट, रिबॉन्डिंग, स्ट्रेटनिंग यांसारख्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून केसांची चमक वाढवली जाते. पण ट्रीटमेंट केल्यानंतर काही काळापुरतेच केस सुंदर दिसतात आणि पुन्हा एकदा केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच महागडे शाम्पू किंवा कंडिशनरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे केस नैसर्गिकरित्या सॉफ्ट आणि मुलायम होण्यास मदत होते. वारंवार केमिकल युक्त हेअर केअरचा वापर केल्यास केस आणखीनच खराब होऊन जातात. त्यामुळे घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ केस आतून मुलायम करण्यास मदत करतात आणि केसांची नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवतात.
लवंगमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, ज्यामुळे टाळूवर वाढलेला कोंडा किंवा इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. केसांमध्ये खूप जास्त कोंडा झाला असेल तर लवंगाच्या मिश्रणाचा वापर करावा. कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण जास्त असते. सल्फरमुळे केसांना आवश्यक पोषण मिळते आणि केसांची मूळ मजबूत होण्यास मदत होते. कोरफडीचा गर टाळूला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कांद्याच्या मिश्रणापासून बनवलेला हेअर मास्क केसांवर लावावा.






