संसर्गजन्य आजारांपासून कायमची मिळेल सुटका! 'या' पदार्थांनी आठवड्यातून दोनदा करा गुळण्या
वर्षाच्या बाराही महिने दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. साथीच्या आणि संसर्गजन्य आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. घशा वाटे जंतू शरीरात प्रवेश करतात आणि संपूर्ण शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण करतात. त्यामुळे घशाची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. घशात वाढलेल्या इन्फेक्शनकडे फारसे लक्ष दिले जात नाही. पण असे न करता घशासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर गरम पाण्याचे सेवन करावे. घसा दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर गुळण्या केल्या जातात. गुळण्या केल्यामुळे घशाच्या वेदनांपासून आराम मिळतो आणि घशात वाढलेली खवखव बरी होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आठवड्यातून दोनदा गुळण्या करताना कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या वापरामुळे घशात वाढलेली खवखव दूर होईल आणि आरोग्य सुधारेल.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर नियमित गरम पाण्याच्या गुळण्या केल्यास घशात वाढलेली खवखव आणि वेदना कमी होतात. कोमट पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे घशात वाढलेले जंतू कमी होतात आणि साथीच्या आजारांचा संसर्ग कमी होतो. जीवनशैलीतील बदलांमुळे ठराविक अवयवांची काळजी घेतली जाते. या सोबतच घशाची सुद्धा काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. दातांवर वाढलेले जंतू हळूहळू शरीरात प्रवेश करतात. हे जंतू वाढल्यानंतर घसा खवखवणे, घशात वेदना होणे, घशाला सूज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात. कोमट पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे हिरड्या मजबूत होतात.
सकाळी उठून नियमित गुळण्या केल्यामुळे संपूर्ण शरीराचे रक्तभिसरण सुधारते आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होतो. गुळण्या करताना पाण्यात अनेक लोक वेगवेगळे लिक्विड टाकतात. पण याऐवजी तुम्ही मीठ टाकून गुळण्या करू शकता. घशात वाढलेले जंतू मारण्यासाठी मिठाचा वापर करावा. घशातील सूज, खवखव व वेदना कमी करण्यासाठी आठवड्यातून दोनदा मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. याशिवाय कोमट पाणी ग्लासात घेऊन त्यात चिमूटभर हळद आणि मीठ टाकून गुळण्या केल्यास लगेच प्रभाव दिसून येईल.
दैनंदिन आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. तिखट, गोड, आंबट आणि इतर अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण या पदार्थांच्या सेवनामुळे काहीवेळा तोंडाला दुर्गंधी येते. तोंडात साचून राहिलेल्या जंतूंमुळे तोंडाला वास येतो. अशावेळी मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी होते आणि तोंड स्वच्छ राहते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. मिठाच्या पाण्याशिवाय तुरटीच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास हिरड्यांना आलेली सूज कमी होते. कान दुखणे, घसा दुखणे इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळेल.