सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीरात दिसून येतील 'हे' चमत्कारीत बदल
सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने करण्यासाठी नियमित व्यायाम, धावणे, चालणे, योगासने इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. यासोबतच काहींना उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय असते. पण रिकाम्या पोटी चहाचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाण्यात असलेले गुणधर्म शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतात. कोमट पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. आयुर्वेदामध्ये सुद्धा कोमट पाण्याला विशेष महत्व देण्यात आले आहे. आयुर्वेदानुसार, सकाळी उठून उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते आणि शरीरातील अग्नी वाढतो.(फोटो सौजन्य – istock)
कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला असंख्य फायदे होतात. उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील अग्नी जागृत होतो. याशिवाय रात्रीच्या वेळी खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. आतड्यांमधील हालचाल सुलभ करण्यासाठी कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि पोटाच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित कोमट पाणी प्यावे. आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
गरम पाणी प्यायल्यामुळे आतड्या उत्तेजित होतात आणि पचनक्रिया सहज होते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाणी प्यावे. यामुळे संपूर्ण डिटॉक्स होते. गरम पाण्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये जमा झालेला विषारी मल बाहेर पडून जातो. कोमट पाण्याच्या सेवनामुळे शरीराचे तापमान वाढते. लिव्हर आणि किडनी डिटॉक्स करण्यासाठी नियमित कोमट पाणी प्यावे. शरीर शुद्ध करण्यासाठी कोमट पाण्यात आल्याचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल.
अल्झायमर म्हणजे काय? गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीला दिसून येतात ‘ही’ लक्षणे
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी आहारात बदल केला जातो तर कधी तासनतास व्यायाम केला जातो. पण तरीसुद्धा वजन कमी होत नाही. हे सर्व उपाय करण्याऐवजी सकाळी उठून कोमट पाणी प्यावे. गरम पाण्याच्या सेवनामुळे भूक कमी लागते आणि कॅलरी जास्त प्रमाणात जळतात. कोमट पाणी शरीरात वाढलेला कफ कमी करण्यास मदत करतो, ज्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते, कोमट पाणी शरीरातील रक्तवाहिन्यांचा विस्तार करतात. याशिवाय रक्तप्रवाह सुरळीत चालू राहिल्यामुळे सर्वच अवयवांना व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित कोमट पाणी प्यावे.
गरम पाणी पिण्याचे फायदे:
गरम पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. हे शरीरातील रक्तसंचय कमी करण्यास मदत करते.
गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे आणि तोटे:
गरम पाण्याने अंघोळ केल्यास थकवा कमी होतो. खूप जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेला आणि शरीराला हानी पोहोचू शकते.
गरम पाण्यासाठी हीटर वापरताना खबरदारी:
वॉटर हीटर रॉड वापरताना तो दिलेल्या चिन्हापर्यंत पाण्यात टाकावा. पाणी गरम करण्याच्या रॉडचा प्लग चांगल्या स्थितीत असावा आणि रॉड खराब असल्यास वापरू नये.