पोटात कायमच गॅस होतो? मग दैनंदिन आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरात होणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष द्यावे. काहींना जेवल्यानंतर लगेच पोट फुगणे, गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. आहारात तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्यासोबतच पचनाच्या समस्या सुद्धा उद्भवू लागतात. त्यामुळे कायमच शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. पोटात वाढलेल्या गॅसमुळे कायमच अस्वस्थ वाटू लागते. याशिवाय वारंवार उलट्या, मळमळ इत्यादी लक्षणे दिसून येतात. यामुळे काहीवेळा लिव्हरचे आजार, बद्धकोष्ठता, पोटात दुखणे, गर्भावस्था इत्यादी आजार होऊ शकतात. बद्धकोष्ठतेची समस्या वाढू लागल्यानंतर आहारात बदल करणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात बीन्स, डाळी, ब्रोकोली, कोबी, जास्त मीठ असलेले पदार्थ आणि दुधाचे पदार्थ खाल्यामुळे बद्धकोष्ठता वाढते.(फोटो सौजन्य – istock)
Worst Food For Kidney: किडनी सडवतात 8 पदार्थ, नाश्त्यात भरभरून खात आहेत लोक, 1 दिवसात होतील स्टोन
पोटात वाढलेला गॅस आणि मळमळ कमी करण्यासाठी आलं पुदिन्याच्या चहाचे सेवन करावे. या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात जमा झालेला विषारी वायू बाहेर पडून जातो आणि आरोग्य सुधारते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आल्याच्या चहाचे सेवन करावे. इंटेस्टाइनल ट्रॅक्टमधील गॅस कमी करण्यासाठी आलं अतिशय प्रभावी ठरते. आल्याचा चहा बनवताना पाणी गरम करून त्यात किसलेले आलं टाकून पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर पुदिन्याची पाने टाकून काहीवेळा उकळवून घ्या.
बडीशेप खाल्यामुळे पचनक्रिया कायमच निरोगी राहील. पचनाच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर बडीशेपचे पाणी प्यावे. यामध्ये असलेले गुणकारी घटक पोटात वाढलेला गॅस कमी करतात. बडीशेपचे पाणी तयार करताना पाण्यात बडीशेप, आलं, हिंग, काळे मीठ घालून व्यवस्थित उकळवून घ्या. हे पाणी उपाशी पोटी प्यायल्यास पोटात वाढलेला गॅस कमी होईल.
रोजच्या आहारात वेगवेगळ्या डाळींचे धान्यांचे सेवन केले जाते. हे पदार्थ बनवताना कायमच हिंग आणि जिऱ्याचा वापर करावा. ज्यामुळे पोटात वाढलेला गॅस कमी होतो आणि अपचन होत नाही. शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहण्यासाठी ओवा, हिंग, धणे, बडीशेप आणि जिऱ्याची पावडर इत्यादी मसाल्यांचा तडक जेवणाला द्यावा.
ब्लोटिंगची सामान्य कारणे:
जास्त खाणे, पोटात गॅस तयार करणारे अन्न किंवा विशिष्ट पदार्थांची ॲलर्जी झाल्यामुळे ब्लोटिंग होते.
ब्लोटिंगची लक्षणे:
पोटात घट्टपणा किंवा भरल्यासारखे वाटणे.पोटात अस्वस्थता किंवा वेदना.पोटात गॅसची भावना किंवा बाहेर पडणे.पोटाचा आकार वाढणे किंवा सुजणे.
कधी डॉक्टरांना भेटावे?
घरगुती उपाय करूनही फरक न पडल्यास.फक्त फुगण्याव्यतिरिक्त इतर गंभीर लक्षणे असल्यास, जसे की तीव्र वेदना, आतड्यांच्या सवयींमध्ये बदल (सतत अतिसार किंवा बद्धकोष्ठता), रक्तस्त्राव किंवा वजन कमी होणे.