मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा 'या' पदार्थांचा समावेश
प्रत्येक महिन्यातील चार ते पाच दिवस सर्वच महिलांना मासिक पाळी येते. या दिवसांमध्ये महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. हार्मोन्सचे असंतुलन, मासिक पाळीत वाढलेला किंवा कमी रक्तस्त्राव, वेदना इत्यादी अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी आल्यानंतर काहींना कंबर दुखणे, ओटीपोटात वेदना होणे, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. हल्ली बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येत आहे. आहारात होणारे बदल,तणाव, कुटुंबिक जबाबदाऱ्या, पोषक तत्वांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होत आहे. मासिक पाळीच्या चक्रात बदल झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीरावर लगेच दिसून येतात. याशिवाय अनेकांना पीसीओडी, पीसीओएस किंवा मासिक पाळीमध्ये अतिशय कमी रक्तस्त्राव होतो.(फोटो सौजन्य – istock)
चार ते पाच दिवस येणाऱ्या मासिक पाळी दरम्यान काहींना अतिशय कमी रक्तस्त्राव होतो तर काहींना खूप जास्त रक्तस्त्राव होतो, ज्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा बिघडू लागते. मासिक पाळी आल्यानंतर महिलांना अनेकदा थकवा, मूड स्विंग्स, चिडचिडेपणा, पाठदुखी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीतील रक्तस्त्राव सुधारण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील.
पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पालेभाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. आहारात मेथी, पालक, मुळा इत्यादी वेगवेगळ्या भाज्यांचे सेवन करावे. याशिवाय सकाळी उठल्यानंतर नियमित बीटचा रस प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील. या भाज्यांच्या सेवनामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. तसेच आहारात कायमच लोहयुक्त भाज्यांचे सेवन करावे.
मासिक पाळीतील रक्तस्त्राव सुधारण्यासाठी आहारात नियमित हंगामी किंवा बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या फळांचे सेवन करावे. संत्री, द्राक्षे, किवी, डाळिंब आणि लिंबू इत्यादी फळांचे सेवन केल्यास शरीराला विटामिन सी आणि लोह मिळेल. यामुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघण्यास मदत होईल.
महिलांनी आहारात अक्रोड, खजूर, मनुके आणि अंजीर इत्यादी सुक्या मेव्यांचे सेवन करावे. यामुळे मासिक पाळीतील रक्तप्रवाह सुधारतो. कारण सुक्या मेव्यामध्ये लोह आणि हेल्दी फॅट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. शरीराला आलेली सूज किंवा मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी सुका मेवा खावा.
मासिक पाळीतील रक्तप्रवाह किती दिवसांपर्यंत असतो?
सामान्यतः, मासिक पाळी 2 ते 7 दिवसांपर्यंत टिकते. काही स्त्रियांमध्ये हा कालावधी थोडा कमी-जास्त असू शकतो.रक्तप्रवाह पहिल्या 1-2 दिवसांमध्ये जास्त असतो आणि नंतर हळू हळू कमी होतो.
मासिक पाळीतील रक्तप्रवाह कमी करण्यासाठी काय करावे?
कॅफीन, Cold drinks, आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ टाळा.तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योगा करा.
भरपूर पाणी प्या.डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे.
मासिक पाळीतील रक्तप्रवाहाचा रंग बदलल्यास काय करावे?
मासिक पाळीच्या सुरुवातीला किंवा शेवटी लालसर-काळा किंवा तपकिरी रंग दिसणे सामान्य आहे.जर रंग खूप गडद असेल किंवा खूप दिवसांपर्यंत तसाच राहिल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा, कारण हे काही आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते.