
२० मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! चमचाभर बेसनमध्ये मिक्स करा 'हा' पदार्थ
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्यासोबतच त्वचेची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे चेहऱ्याकडे लक्ष देण्यास जास्त वेळ मिळत नाही. प्रदूषण आणि हवामानातील बदलांचा परिणाम चेहऱ्यावर झाल्यानंतर त्वचा खूप जास्त निस्तेज होऊन जाते. याशिवाय चेहऱ्यावर पिंपल्स येणे, वांग येणे, डार्क सर्कल्स इत्यादी अनेक त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागतात. थकलेली आणि निस्तेज झालेली त्वचा पुन्हा नव्याने सुंदर आणि तेजस्वी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअरचा वापर केला जातो तर कधी फेस क्रीम लावून त्वचेची काळजी घेतली जाते. (फोटो सौजन्य – istock)
थंडीमुळे ओठ कोरडे आणि निस्तेज झाले आहेत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा नॅचरल लिपबाम
थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यासह त्वचा आणि केसांवर लगेच दिसून येतो. उन्हात गेल्यानंतर त्वचा खूप जास्त टॅन होऊन जाते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि डार्क सर्कल्स घालवण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअरचा वापर केला जातो. पण त्याऐवजी चमचाभर बेसनाचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला बेसनाचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी बेसन पिठाचा वापर करतात.
बेसन पिठाचा वापर करून फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये चमचाभर बेसन घेऊन त्यात मुलतानी माती, कॉफी, लिंबाचा रस आणि दही घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेला टॅनिंग आणि डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल. त्वचेची काळजी घेताना कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. मसाज करून झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा चेहऱ्यावर लावल्यास त्वचा सुंदर आणि डागविरहित होईल.
त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणत्याही महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. बेसन पिठात असलेले गुणधर्म त्वचेवर डाग आणि टॅनिंग घालवण्यासाठी मदत करतात. तर दही त्वचा हायड्रेट ठेवते. डोळ्यांखाली वाढलेले डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी बेसन पिठात गुलाब पाणी मिक्स करून लावल्यास डोळ्यांखालीं आलेली काळे वर्तुळ नष्ट होऊन त्वचा सुधारेल. फेसपॅक बनवण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक कायम टिकून राहते.