थंडीमुळे ओठ कोरडे आणि निस्तेज झाले आहेत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा नॅचरल लिपबाम
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला भरपूर पाण्यासोबतच पोषणाची सुद्धा आवश्यकता असते. कारण या दिवसांमध्ये वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे भरपूर पाण्याचे सेवन, उष्ण पदार्थांचा आहारात समावेश करावा. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर ओठ कोरडे पडणे, ओठांमधून रक्त येणे, ओठांची त्वचा निघून रक्त येणे इत्यादी भरमसाट समस्या उद्भवू लागतात. ओठ फुटल्यानंतर ते पुन्हा नव्याने चमकदार करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळी लिपबाम किंवा क्रीमचा वापर केला जातो. मात्र लिपबाम आणि क्रीममध्ये वापरले जाणारे हानिकारक केमिकल आणि रासायनिक घटक ओठांचे नुकसान करून टाकतात. (फोटो सौजन्य – istock)
सुकलेल्या ओठांची काळजी घेण्यासाठी बरेच वेगवेगळे उपाय केले जातात. पण केमिकल असलेल्या रसायनांचा वापर केल्यास ओठ पुन्हा नव्याने चमकदार होण्याऐवजी आणखीनच खराब होऊन जातात. ओठांची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नैसर्गिक पदार्थांचा वापर करून लिपबाम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. घरी तयार केलेले लिपबाम लवकर खराब होत नाही. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर कायमच नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. यामुळे ओठांवर चमक टिकून राहते आणि फाटलेल्या ओठांच्या भेगा भरून निघतात.
नॅचरल लिपबाम बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये तूप आणि नारळाचे तेल घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण मंद आचेवर गरम करून घ्या. तूप पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात मध घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण काचेच्या लहान डबीमध्ये ओतून सेट होण्यासाठी ठेवा. ३ ते ४ तासांनंतर लिपबाम तयार होईल. हे लिपबाम महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. घरगुती पदार्थांपासून बनवलेल्या लिपबाममध्ये कोणतेही कृत्रिम रंग, सुगंध किंवा जड केमिकल्स नसतात. तयार केलेले लिपबाम हलक्या हाताने ओठांवर लावून मसाज करा. यामुळे ओठांवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होईल. सतत फाटणारे, रक्ताळणारे ओठ चांगले करण्यासाठी नियमित लिपबाम लावावे.
तूप आणि नारळाच्या तेलात असलेल्या घटकांमुळे त्वचेला पोषण मिळते. यामुळे त्वचा खूप जास्त हायड्रेट राहते. नारळाच्या तेलाचा वापर ओठांसाठी केल्यास ओठांवरील कोरडेपणा दूर होऊन ओठ सुंदर आणि गुलाबी राहतात. त्वचेच्या कोणत्याही समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती पदार्थांपासून तयार केलेल्या स्किन केअरचा वापर करू शकता. यामुळे त्वचेचे कोणतेही नुकसान होत नाही. तसेच लिपबामला गुलाबी रंग हवा असल्यास त्यात बीटचा रस सुद्धा टाकू शकता.






