Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी 'या' पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर,
Green Tea: सकाळी उठल्यानंतर अनेकांना ग्रीन टी पिण्याची सवय असते. ग्रीन टी शिवाय दिवसाची चांगली सुरुवात होत नाही. उपाशी पोटी दूधाचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी प्यायल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होते. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा निस्तेज होऊन जाते आणि त्वचेच्या समस्या वाढू लागतात. त्वचा निस्तेज दिसणे, अतिरिक्त तेलकटपणा किंवा धुळी इत्यादी कारणांमुळे चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा होण्यास सुरुवात होते आणि चेहरा खूप जास्त तेलकट दिसू लागतो. त्यामुळे त्वचेची काळजी घेताना योग्य स्किन केअर रुटीन फाॅलो करणे फार आवश्यक आहे. बाजारातील महागड्या उत्पादनांचा वापर करण्याऐवजी ग्रीन टी चा वापर करावा. ग्रीन टीच्या वापरामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य – istock)
ग्रीन टी तुम्ही अंघोळीच्या पाण्यांत सुद्धा टाकू शकता. २ ते ३ कप ग्रीन टी तयार करुन थंड करा. थंड झालेली ग्रीन टी अंघोळीच्या पाण्यात टाकून त्याच पाण्याने अंघोळ करावी. तसेच बाथ टापात तयार केलेली ग्रीन टी ओतून १० ते १५ मिनिटे पाण्यात बसावे. पाण्यात बसणे शक्य न झाल्याकस अंघोळीसाठी पाण्याचा वापर करावा. पण जर तुमची त्वचा खूप जास्त चिकट किंवा जळजळ होत असेल तर स्वच्छ पाण्याने शॉवर घ्यावा.
ग्रीन टीचा वापर त्वचेसबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. बॉडी मिस्ट बनवण्यासाठी टोपात पाणी गरम करून त्यात ग्रीन टी टाकून उकळवून घ्या. तयार केलेले पाणी थंड करण्यासाठी ठेवा. थंड झालेले मिश्रण गाळून काचेच्या स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. स्प्रे बॉटल थंज करण्यासाठी काहीवेळ फ्रीजमध्ये ठेवून घ्या. तयार केलेले बॉडी मिस्ट अंगाला लावून हलक्या हाताने मसाज करा आणि त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका.
टोपात पाणी गरम करुन त्यामध्ये चमचाभर तांदूळ टाकून पाण्याला उकळी काढा. पाण्याला उकळी काढून पाणी थंड करण्यासाठी ठेवा. थंड झालेल्या पाण्यात ग्रीन टी मिक्स करून घ्या. चेहऱ्यावर तयार केलेले मिश्रण लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि त्वचा पाण्याने स्वच्छ करा. ग्रीन टीचे अँटिऑक्सिडंट्स चेहऱ्यावर वाढलेला थकवा कमी करण्यास मदत करते. तांदळाचे पाणी त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते. डोळ्यांचा थकवा कमी करण्यासाठी दोन स्वच्छ कॉटन पॅड्सवर ग्रीन टी टाकून डोळ्यांवर ठेवावा.






