
आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'हे' बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार
काळ्या रंगाची शौच होण्यामागील कारणे:
आतड्यांचे आरोग्य कशामुळे बिघडते?
पचनसंस्थेत रक्तस्त्राव झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
Gut Inflammation: शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर बद्धकोष्ठता, अपचन, वारंवार ऍसिडिटी होणे, छातीमध्ये जळजळ इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. याशिवाय शौचाच्या रंगावरून, त्याच्या स्वरूपावरून शरीरात होणारे बदल दिसू लागतात. शौचाच्या रंगात अचानक झालेल्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. काहीवेळा शौचाचा रंग पूर्णपणे काळा दिसू लागतो तर काहीवेळा शौचातून रक्त पडते. त्यामुळे शौचाच्या सवयींमध्ये होणाऱ्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. कारण आतड्यांचे आरोग्य बिघडल्यानंतर शौचाच्या सवयींमध्ये बदल दिसू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
आयर्नच्या गोळ्या, काही औषधे किंवा गडद रंगाचे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा काळी शौचाला होते, असे गृहीत धरतात आणि दुर्लक्ष करतात. काळ्या रंगाची शौचाला होणे केवळ खाण्यापिण्याच्या बदलांमुळे नाहीतर शरीरा अंतर्गत आजारांमुळे सुद्धा असू शकते. पचनसंस्थेत होणाऱ्या अंतर्गत रक्तस्त्रावाचे गंभीर परिणाम शरीरावर लगेच दिसून येतात. आतड्यांमध्ये येणारे अल्सर किंवा अतिशय नाजूक जखमा आतड्यांचे आरोग्य पूर्णपणे बिघाडून टाकतात. चला तर जाणून घेऊया आतड्यांना जखम झाल्यांनतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती.
प्रत्येक वेळी काळ्या रंगाची शौचाला होणे म्हणजे गंभीर आजाराची लक्षणे असू शकत नाहीत. विशिष्ट अन्नपदार्थ आणि औषधांच्या सेवनामुळे शौचामध्ये तात्पुरता बदल होतो. जांभळे, ब्लॅकबेरीज किंवा डार्क रंगाचे गोड पदार्थ खाल्ल्यामुळे शौचाच्या रंगात बदल होऊ शकतो. लोहाच्या गोळ्या घेणाऱ्या व्यक्तीला सामान्यपणे काळ्या रंगाची शौचाला होते. डांबरासारखी काळी, चिकट व घट्ट शौचाला होणे यामध्ये खूप जास्त फरक आहे. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
पचनसंस्थेतील वरच्या भागात रक्तस्त्राव असेल तर शौचाचा रंग बदलून जातो. डांबरासारखी काळी आणि चिकट शौच होते. ज्याला वैद्यकीय भाषेत मेलेना असे सुद्धा म्हंटले जाते. रक्तस्त्राव झाल्यानंतर जठरातील आम्ल आणि पाचक रसांमधून पुढे जाताना ते पचन होते, ज्यामुळे शौचाचा रंग लाल दिसतो. जठरामध्ये किंवा लहान आतड्यात अल्सर होणे, जठराच्या आतील थराला सूज येणे, वारंवार उलट्या होणे इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे शौचावर परिणाम होतो.
तीव्र अशक्तपणा, अवाजवी थकवा आणि चक्कर येणे.
डोक्यावर हलकेपणा जाणवणे, अस्वस्थ वाटणे किंवा अचानक कापरे भरणे.
उलट्यामधून रक्त पडणे किंवा कॉफीच्या कणांसारख्या रंगाची उलटी होणे.
पचनसंस्थेत रक्तस्त्रावाचा इतिहास
रक्त पातळ होण्याच्या गोळ्यांचे सेवन.
Ans: पोटदुखी, पोट फुगणे, जुलाब, शौचाच्या सवयींमध्ये बदल, भूक कमी होणे, अशक्तपणा आणि काही वेळा शौचातून रक्त जाणे अशी लक्षणे दिसू शकतात.
Ans: काळा, डांबरासारखा शौच काही वेळा पचनसंस्थेतील वरच्या भागातून रक्तस्रावाचे लक्षण असू शकतो. मात्र काही आयर्नच्या औषधांमुळे किंवा विशिष्ट पदार्थांमुळेही शौच काळा दिसू शकतो. कारण स्पष्ट नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Ans: संसर्ग, दाहक आतड्यांचे आजार, काही औषधे, प्रतिकारशक्तीशी संबंधित समस्या आणि इतर पचनसंस्थेतील विकारांमुळे आतड्यांमध्ये दाह होऊ शकतो.