(फोटो सौजन्य: istock)
Travel News : देशातील एक असे ठिकाण जिथे आहेत 99,99,999 मुर्त्या, फार रंजक याचे याची कहाणी
शरीरात बराच काळापासून जर आयोडिनची कमतरता असेल तर याचा परिणाम आपल्या दैनंदिन आरोग्यावर दिसू लागतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे मानेतील थायरॉईड ग्रंथीला सूज येऊ शकते, ज्याला गॉयटर (गलगंड) म्हणतात. याव्यतिरिक्त थायरॉइड हार्मोनचे पातळी कमी झाल्याने थकवा, वजन वाढणे, जास्त थंडी वाजणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. लहान मुलांमध्ये याची कमतरता सामान्य विकास आणि मानसिक क्षमतेवर परिणामकारक ठरतो. एकाग्रता आणि स्मरणशक्तीसंबंधित समस्या देखील आयोडिनच्या कमतरतेमुळे जाणवतात. गर्भधारणेवेळी शरीराला पर्याप्त आयोडिन न मिळणे एक समस्येचे कारण ठरु शकते.
आयोडिनची कमतरता भरुन काढण्यासाठी काय खावं?
आयोडिनयुक्त मीठ
शरीरात आयोडिनचे प्रमाण भरुन काढण्यासाठीचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आहारात आयोडिनयुक्त मीठाचा समावेश करणे. दररोज सामान्य मीठाऐवजी आयोडिनयुक्त मीठाचा आहारात समावेश केल्याने शरीरातील आयोडिनचे प्रमाण वाढवता येऊ शकते. तथापि, मीठाचा जास्ती वापर आपल्या आहारात करु नका. योग्य प्रमाणातच याचा आहारात समावेश करा,
मासे
समुद्री खाद्यपदार्थ जसे की माशांंमध्येही आयोडिनचे चांगले प्रमाण आढळून येते. आपल्या रोजच्या आहारात तुम्ही अधूनमधून माशांचा समावेश करु शकता. यामुळेही शरीरातील आयोडिनचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
दूध आणि दूधापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये आयोडिनचा चांगला स्त्रोत आढळून येतो. यासाठी आहारात तुम्ही दूध, दही, पनीर अशा पदार्थांचा समावेश करु शकता. अंडी आणि बटाट्यातही आयोडिनचे प्रमाण मुबलक आढळते. रोजच्या आहारात काही बदल करुन तुम्ही या आयोडिनयुक्त पदार्थांचा आपल्या जेवणात समावेश करु शकता.






