Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात केस राहतील मुलायम आणि सॉफ्ट! जास्वदींच्या फुलांपासून घरी तयार करा नॅचरल हेअर मास्क, केसांना मिळेल भरपूर पोषण

पावसाळ्यात केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवलेला हेअर मास्क केसांवर लावावा. यामुळे केस चमकदार आणि मऊ होण्यास मदत होते. चला जर जाणून घेऊया हेअर मास्क बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 25, 2026 | 09:52 AM
पावसाळ्यात केस राहतील मुलायम आणि सॉफ्ट! जास्वदींच्या फुलांपासून घरी तयार करा नॅचरल हेअर मास्क, केसांना मिळेल भरपूर पोषण

पावसाळ्यात केस राहतील मुलायम आणि सॉफ्ट! जास्वदींच्या फुलांपासून घरी तयार करा नॅचरल हेअर मास्क, केसांना मिळेल भरपूर पोषण

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात पावसाने हजेरी लावली आहे. या दिवसांमध्ये हवेतील आर्द्रता आणि दमटपणामुळे केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात. केस सतत चिकट तेलकट होणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस मुळांपासून कमकुवत होणे, कोरडे पडणे इत्यादी असंख्य समस्या उद्भवून केसांचे आरोग्य खराब होऊन जाते. सर्वच महिलांना केसांच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. केसांचे हरवलेले सौंदर्य पुन्हा परत मिळवण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन महागड्या हेअर ट्रीटमेंट, हेअर स्पा आणि इतर वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. यामुळे काही काळापुरते केस अतिशय सुंदर आणि मुलायम दिसतात. पण कालांतराने पुन्हा एकदा केसांच्या समस्या वाढून केस कोरडे आणि निस्तेज दिसतात. त्यामुळे कायमच केसांच्या चमकदार वाढीसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट न करता घरगुती उपाय करावेत.(फोटो सौजन्य – AI)

पिंपल्स, रॅशेस अन् इन्फेक्शनवर रामबाण उपाय; त्वचेसाठी कडुलिंब ठरतो वरदान; समस्या होतील दूर

मऊ, लांब आणि चमकदार केस मिळवण्यासाठी केवळ केमिकल प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करून केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवावी. आज आम्ही तुम्हाला जास्वदींच्या फुलांचा वापर करून हेअर मास्क बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला हेअर मास्क केसांच्या मुळांना भरपूर पोषण देईल आणि केस चमकदार सुंदर करण्यास मदत करेल. जास्वदींच्या फुलांमध्ये असलेले गुणकारी घटक केसांना आतून पोषण देतात आणि नॅचरली मजबूत ठेवण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊया.

जास्वदींच्या फुलांचा हेअर मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • जास्वदींची फुले
  • जास्वदींची पाने
  • कढीपत्ता
  • कोरफड जेल
  • तुळशीची पाने
  • मेथी दाणे
  • काळे तीळ
  • कलौंजी
  • पाणी
  • खोबरेल तेल

कृती:

हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात जास्वंदीची पाने, फुले, कढीपत्ता, तुळशीची पाने, मेथी दाणे, काळे तीळ, कलौंजी आणि पाणी घालून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट मिक्स करून त्यात खोबरेल तेल घालून मिक्स करा. हेअर मास्क केसांना लावण्याआधी केस व्यवस्थित विंचरून घ्यावे. त्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत हेअर मास्क लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर ४० मिनिटं हेअर मास्क केसांवर तसाच ठेवून द्या. यामुळे केसांना मुळांना पोषण मिळेल आणि टाळूवर वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर कोमट पाण्याने केस सौम्य शाम्पुचा वापर करून स्वच्छ धुवून घ्या. हेअर मास्क लावल्यानंतर केसांना अजिबात कंडिशनर लावू नये.

३० दिवसांमध्ये केस गळणे होईल पूर्णपणे बंद! केसांच्या मुळांशी लावा ‘या’ पदार्थांचे पाणी, वाढत्या समस्यांपासून मिळेल सुटका

जास्वदींच्या फुलांमध्ये असलेले गुणकारी घटक केसांची लवचिकता सुधारतात. याशिवाय फुलांमध्ये असलेले अमिनो अॅसिड केस मऊ करण्यास मदत करते. कढीपत्त्याच्या पानांमध्ये असलेले पोषक घटक केस आतून मजबूत करतात. खोबरेल तेल केसांवर लावल्यामुळे कोरडे केस मऊ होऊन केसांची गुणवत्ता सुधारते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केसांची योग्य पद्धतीने काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा केसांमध्ये खूप जास्त कोंडा होऊन केस तुटण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Hair beauty prepare a natural hair mask at home using hibiscus flowers to give your hair plenty of nourishment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
2

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
3

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम
4

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.