३० दिवसांमध्ये केस गळणे होईल पूर्णपणे बंद! केसांच्या मुळांशी लावा 'या' पदार्थांचे पाणी, वाढत्या समस्यांपासून मिळेल सुटका
महिलांपासून ते अगदी पुरुषांपर्यंत सगळ्यांचं आपले केस कायमच मजबूत आणि काळेभोर हवे असतात. घनदाट मजबूत आणि लांबलचक केस महिलांच्या सौंदर्यात भर पडतात. पण वातावरणात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे शरीरासोबतच केसांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो. हल्ली केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या आहे, असे सगळ्यांचं वाटते. पण वारंवार केसांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास टक्कल पडण्याची शक्यता असते. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे शाम्पू, हेअर सिरम, कंडिशनर इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो.(फोटो सौजन्य – istock)
केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये महागड्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण यामुळे केसांवर कोणतेही परिणाम दिसून येत नाहीत. त्यामुळे केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला केस गळणे पूर्णपणे थांबवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतील आणि केस मजबूत करण्यास मदत होईल. केस गळणे किंवा केसांमध्ये झालेला कोंडा कमी करण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे केसांच्या समस्या कमी होतात.
टोपात एक ग्लास पाणी घेऊन त्यात तांदूळ, मेथी दाणे, कलौंजी घालून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी गाळून त्यातील बिया बाजूला काढून टाका आणि पाण्यामध्ये जास्वदींची फुले आणि रोझमेरी पाने घालून उकळवण्यासाठी ठेवा. ५ ते ६ मिनिटं मंद आचेवर पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. तयार केलेले पाणी थंड झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि नियमित केसांच्या मुळांवर स्प्रे करा. हे पाणी केसांना लावल्यानंतर केस धुवण्याची अजिबात आवश्यकता नाही. नियमित दिवसभरातून दोन वेळा पाणी केसांच्या मुळांवर लावल्यास केसांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.
Skin Care Mistakes: स्किनकेअरमध्ये ‘या’ चुका करताय? आजच टाळा, नाहीतर त्वचेचे होईल मोठे नुकसान
केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर वेळीच लक्ष देणे फार आवश्यक आहे. अन्यथा केस खूप जास्त गळतात आणि केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती असते. मेथी दाण्यांच्या वापरामुळे केसांना आवश्यक पोषण मिळते आणि केस मजबूत घनदाट होण्यास मदत होते. घनदाट आणि लांब केसांसाठी कायमच घरगुती उपाय करावेत. कोणत्याही हेअर ट्रीटमेंट करण्याआधी त्या केसांना सूट होतील की नाही, हे पाहून नंतरच हेअर ट्रीटमेंट कराव्यात.






