Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Botox: हेअर बोटॉक्सची वाढती क्रेझ! केस होतात सिल्की अन् शायनी, ट्रीटमेंटआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Hair Botox Treatment: हेअर बोटॉक्समुळे केस सॉफ्ट अन सिल्की होतात यामुळे क्रेझ वाढत चालली आहे. परंतु, हेअर बोटोक्स करण्याआधी या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 07, 2026 | 08:45 PM
Hair Botox:  हेअर बोटॉक्सची वाढती क्रेझ! केस होतात सिल्की अन् शायनी, ट्रीटमेंटआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
Follow Us
Follow Us:
  • हेअर बोटॉक्सची वाढती क्रेझ
  • केस होतात सॉफ्ट अन् सिल्की
  • ट्रीटमेंटआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
धूळ, प्रदूषण, आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा अतिवापर यामुळे केस निस्तेज होतात. कोरडे, फ्रिझी आणि स्प्लिट एंड्स मुळे लोक विविध हेअर ट्रीटमेंट्सकडे वळत आहेत. त्यामध्ये सध्या ‘हेअर बोटॉक्स’ ही ट्रीटमेंट विशेष लोकप्रिय ठरत आहे. केसांना नैसर्गिक चमक, मऊपणा आणि मजबुती देणारी ही प्रक्रिया अनेक ब्युटी सलूनमध्ये मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मात्र ही ट्रीटमेंट करण्यापूर्वी तिचे फायदे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

Skin Care Tips: टॅन अन् डल स्कीनला करा बाय, घरीच तयार करा ‘हा’ फेस पॅक; त्वचा होईल चमकदार

नेमकं काय आहे हेअर बोटॉक्स?

हेअर बोटॉक्स ही केसांना डीप कंडिशनिंग देणारी उपचार पद्धत आहे. या प्रक्रियेत केसांवर प्रोटीन, व्हिटॅमिन्स, केराटिन आणि नैसर्गिक पोषक घटकांचा वापर केला जातो. विशेष म्हणजे यामध्ये त्वचेवरील बोटॉक्सप्रमाणे इंजेक्शन दिले जात नाही. खराब आणि तुटलेले केस दुरुस्त करून त्यांना स्मूथ आणि शायनी बनवणे हा या उपचाराचा मुख्य उद्देश असतो.

हेअर बोटॉक्सचे फायदे कोणते?

ही ट्रीटमेंट केल्यानंतर केस अधिक मऊ, सिल्की आणि चमकदार दिसतात. फ्रिझीनेस कमी होऊन केस व्यवस्थित सेट होण्यास मदत होते. तसेच स्प्लिट एंड्स आणि कोरडेपणाची समस्या कमी होते. अनेक तज्ज्ञांच्या मते, नियमित स्ट्रेटनिंग किंवा हीट स्टायलिंगमुळे खराब झालेल्या केसांसाठी हेअर बोटॉक्स फायदेशीर ठरू शकते.

उपचाराआधी या गोष्टी लक्षात ठेवा

हेअर बोटॉक्स करण्यापूर्वी केसांचा प्रकार आणि स्कॅल्पची स्थिती तपासणे महत्त्वाचे असते. तसेच, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक सलूनमध्ये वापरली जाणारी प्रोडक्टस सारखी नसतात. काही प्रोडक्ट्समध्ये अशी केमिकल असू शकतात जी सेसिंटिव्ह स्कॅल्पला किंवा कमकुवत केसांना हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे, या उपचाराबाबत नेहमी प्रोफेशनल आणि प्रतिष्ठित सलूनचा सल्ला घ्या. जर तुम्हाला जास्त केसगळती, स्कॅल्प ऍलर्जी किंवा केसांशी संबंधित इतर कोणतीही समस्या जाणवत असेल, तर आधी तज्ञांचा सल्ला घ्या. तसेच उपचारानंतर सल्फेट-फ्री शॅम्पू वापरण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून ट्रीटमेंटचा परिणाम अधिक काळ टिकू शकेल.

नैसर्गिक काळजीही तितकीच महत्त्वाची

तज्ज्ञांच्या मते, कोणतीही हेअर ट्रीटमेंट कायमस्वरूपी उपाय नसते. योग्य आहार, भरपूर पाणी, नियमित तेल मालिश आणि कमी केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर केल्यास केस नैसर्गिकरित्या निरोगी राहू शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Skin Pigmentation: चेहऱ्यावरील पिग्मेंटेशनमुळे त्रस्त आहात? ‘हे’ घरगुती उपाय करा ट्राय, त्वचा उजळेल

Web Title: Hair botox treatment benefits side effects hair care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • hair care
  • hair care tips
  • hair care tips in marathi

संबंधित बातम्या

Hair Care: पातळ झालेले केस महिनाभरात होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ स्वयंपाक घरातील पदार्थ
1

Hair Care: पातळ झालेले केस महिनाभरात होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ स्वयंपाक घरातील पदार्थ

पावसाळ्यात केसांमध्ये खूप जास्त कोंडा होतो? केसांमधील चिकटपणा घालवण्यासाठी किती वेळा केस स्वच्छ करावे, जाणून घ्या सविस्तर
2

पावसाळ्यात केसांमध्ये खूप जास्त कोंडा होतो? केसांमधील चिकटपणा घालवण्यासाठी किती वेळा केस स्वच्छ करावे, जाणून घ्या सविस्तर

केसांची वाढ थांबली आहे? केस झपाट्याने वाढण्यासाठी कोणत्या वेळी तेल लावावे, जाणून घ्या सविस्तर
3

केसांची वाढ थांबली आहे? केस झपाट्याने वाढण्यासाठी कोणत्या वेळी तेल लावावे, जाणून घ्या सविस्तर

Hair Care Tips: कमकुवत केसांसाठी फायदेशीर ठरेल रोजमेरी ऑइल! जाणून घ्या  वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
4

Hair Care Tips: कमकुवत केसांसाठी फायदेशीर ठरेल रोजमेरी ऑइल! जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.