Digital Detox : 30 दिवस मोबाईलला द्या ब्रेक! स्मार्टफोन डिटॉक्समुळे शरीरात दिसतील ‘हे’ मोठे बदल
कोरफड म्हणजेच अॅलोवेरा त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि हायड्रेटिंग गुणधर्म त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करतात. नियमित अॅलोवेरा जेल लावल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत मिळू शकते.
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, तर दही त्वचेला मॉइश्चर देण्याचे काम करते. हळद आणि दही एकत्र करून तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत मिळू शकते. तसेच त्वचा मऊ आणि चमकदार दिसू लागते.
टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन ‘सी’ आणि मधातील मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचेसाठी उपयुक्त ठरतात. टोमॅटोचा रस आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील टॅनिंग कमी होण्यास मदत मिळते.
तज्ज्ञांच्या मते, पिग्मेंटेशन टाळण्यासाठी घरगुती उपायांसोबतच सनस्क्रीनचा वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जास्त वेळ उन्हात राहणे टाळावे आणि त्वचेची नियमित काळजी घ्यावी. पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणेही त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक मानले जाते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Healthy Drink: फॅटी लिव्हरपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ ड्रिंक्स ठरतील वरदान; वाचा आरोग्यदायी फायदे






