Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यामुळे होतंय केसांचं नुकसान? केसांची काळजी कशी घ्यायची सोप्या टिप्स

Hair Care Tips: पावसाळा सुरू झालाय आणि अर्थात हवेत गारवा आलाय पण या ऋतूत केसांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तज्ज्ञांकडून पावसाळ्यात केस मऊ - मुलायम ठेवायच्या टिप्स जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 20, 2024 | 02:40 PM
पावसाळ्यातील केसांची काळजी (फोटो सौजन्य - iStock)

पावसाळ्यातील केसांची काळजी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

प्रखर उन्हाळ्यानंतर पावसाचा शिडकावा कितीही हवाहवासा वाटला, तरी या ऋतूमध्ये केसांची निगा राखणं अवघड असतं. प्रचंड आर्द्रता आणि अचानक येणाऱ्या पावसामुळे केस खराब होतात. फ्रीझी होतात, निस्तेज दिसायला लागतात. केस चमकदार ठेवणं अवघड होतं. गोदरेज प्रोफेशनल्सचे नॅशनल टेक्निकल हेड शैलेश मुल्या यांनी केसांची कशी काळजी घ्यायची आणि संपूर्ण पावसाळ्यात केस सुंदर, निरोग कसे ठेवायचे याच्या काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. 

पावसाळ्यात जाणवणारी प्रमुख समस्या केस फ्रीझी होण्याची असते. केसांमधली आर्द्रता वाढल्यामुळे केसांचे क्युटिकल्स फुगतात आणि केस फ्रीझी होतात आणि वाट्टेल तसे वळतात. शिवाय, स्कॅल्प (टाळू) तेलकट होतं आणि केसांची टोकं कोरडी पडतात. यामुळे केसांची निगा राखणं आणखी अवघड होतं. पावसाच्या पाण्यात प्रदूषक घटक असल्यामुळेही केस निस्तेज होण्याची शक्यता असते. मात्र, योग्य काळजी आणि उत्पादनांच्या मदतीने पावसाळ्यात केस निरोगी आणि सुंदर राखणं शक्य आहे. 

केस कोरडे ठेवा

केस भिजल्यावर कोरडे करा (फोटो सौजन्य – iStock)

हा उपाय अगदी स्वाभाविक वाटत असला, तरी पावसाळ्यात केस चमकदार राखण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे, ते कोरडे ठेवणे. केस ओले होऊ नयेत यासाठी सोबत कायम रेनकोट किंवा छत्री ठेवा. केस ओले झाल्यास ते शक्य तितक्या लवकर सौम्य शॅम्पू व कंडिशनरने धुवा आणि केसांत गेलेले प्रदूषित घटक काढून टाका. 

योग्य उत्पादने वापरा 

केस नियमितपणे धुवा आणि टाळू स्वच्छ, कोणत्याही संसर्गापासून मुक्त ठेवा. केसांचा पोत लक्षात घेऊन त्यानुसार खास तयार केले गेलेले शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. उदा. गोदरेज प्रोबायो पॅराबीनमुक्त श्रेणीतील हायड्रेटिंग शॅम्पू वापरल्यानं केसांमधली आर्द्रता टिकून राहील, तर चांगल्या कंडिशनरमुळे केस फ्रीझी होणार नाहीत. त्याशिवाय आठवड्यातून एकदा डीप कंडिशनिंग केल्यानं केस मऊ राहातात व त्यांचं चांगलं पोषण होतं.

फ्रिझीपणावर नियंत्रण ठेवा 

केस फ्रिजी होऊ देऊ नका (फोटो सौजन्य – iStock)

केस फ्रीझी होऊ नयेत यासाठी चांगल्या दर्जाचे सिरम वापरा. केस ओलसर असतानाच त्यातली आर्द्रता पकडून ठेवण्यासाठी सिरम लावा आणि केस मऊशार ठेवा. केस खूप फ्रीझी झाले असतील, बोटोस्मूख उपचारांचा विचार करा. या उपचारांमुळे सर्व प्रकारच्या केसांची मक परत येते, ते आर्द्र हवामानतही दीर्घ काळ मऊ राहातात.

स्ट्रेटनिंग टाळा  

हीटिंगची साधने अती प्रमाणात वापरल्यानेही पावसाळ्यात केसांचे नुकसान होऊ शकते. केसांचा नैसर्गिक पोत स्वीकारा आणि ते वारंवार ब्लो- ड्राय करणं किंवा स्ट्रेटनिंग करणं टाळा. हीट वापरणं गरजेचं असेल, तर आधी उष्णतेपासून रक्षण करणारा स्प्रे वापरा.

अशी हेअर स्टाइल करा 

केस अशा पद्धतीने स्टाईल करा (फोटो सौजन्य – iStock)

वातावरण आर्द्र असताना केस मोकळे सोडण्याऐवजी पोनीटेल, अंबाडा किंवा वेणी घाला, म्हणजे केस सुरक्षित राहातील. या स्टाइल्समुळे केस एकमेकांत अडकणार नाही व तुटणार नाहीत. केस नीटनेटके राहातील. अशाप्रकारे केस बांधल्याने ते हवेतून खूप आर्द्रताही शोषून घेत नाहीत आणि फ्रीझीही होत नाहीत. 

निरोगी आहार आणि भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे 

तुमच्या केसांचे आरोग्य हे तुमच्या एकंदर आरोग्याचे प्रतीक असते. तुमचा आहार प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे यांनी परिपूर्ण असणे आवश्यक आहे. अंडी, सुकामेवा, पालक आणि बेरीज यांमुळे केसांची चांगली वाढ होते. केस आणि टाळू आतून आर्द्र राखण्यासाठी भरपूर पाणी प्या. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने केसांची लवचिकता आणि मजबूती कायम राहाते. 

पावसाळा म्हणजे खराब केस हे समीकरण आता विसरा. थोडी जास्त काळजी आणि योग्य उत्पादनांच्या मदतीने केसांची चांगली निगा राखा, म्हणजे ते सुंदर दिसतील. लक्षात ठेवा निरोगी केसांची सुरुवात चांगल्या हेयर केयर रूटिनने होते.

Web Title: Hair care in monsoon easy tips in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2024 | 02:40 PM

Topics:  

  • hair care
  • hair care tips

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ
1

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू
2

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू

केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे खूप जास्त खाज येते? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, कोंडा होईल मुळांपासून नष्ट
3

केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे खूप जास्त खाज येते? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, कोंडा होईल मुळांपासून नष्ट

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा केळीच्या सालीचा वापर, केस होतील घनदाट
4

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा केळीच्या सालीचा वापर, केस होतील घनदाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.